शहरातील मंदिर विश्वस्त आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन !
यवतमाळ, १५ जानेवारी (वार्ता.) – राज्यशासनाच्या कर्तव्याचा भाग म्हणून देवस्थान भूमीचे संरक्षण, संवर्धन, तसेच चुकीच्या दाव्यांपासून प्रतिबंध करण्यासाठी ‘अँटी लँड ग्रॅबिंग’ (प्रतिबंध) कायदा आणण्यासाठी कायदेशीर कार्यवाही करावी, या मागणीचे निवेदन १४ जानेवारीला ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री सचिवालय कक्षाच्या साहाय्यक अधीक्षक कु. शिल्पा माने यांनी निवेदन स्वीकारले.
या वेळी वनवासी मारुति मंदिराचे श्री. गोपाळ पांडे, श्री. सुबोध राय, बालाजी मंदिराचे अधिवक्ता राजेंद्र गटलेवार, गणेश मंदिराचे डॉ. अशोककुमार काळे, हिंदुस्तानी दुर्गादेवी मंदिर आठवडी बाजारचे श्री. आनंद त्रिवेदी, साई मंदिराचे श्री. भगवानजी डगवार, श्री. जयंत आंबेकर, श्री. नरेंद्र दशसहस्र आणि मंदिर महासंघाचे श्री. दत्तात्रय फोकमारे उपस्थित होते.