पुणे येथे मद्यपी चालकाने महिला पोलिसाला चिरडले !

मिल्‍स परिसरातील पबमधून बाहेर पडलेल्‍या एका भरधाव वाहनाने महिला पोलिसाला चिरडल्‍याची घटना ८ डिसेंबरच्‍या मध्‍यरात्री घडली आहे. नायडू लेन (‘आर्.टी.ओ.’ कार्यालयाजवळ) ‘रुबी हॉस्‍पिटल’कडून ‘आर्.टी.ओ.’च्‍या दिशेने जातांना हा प्रकार घडला आहे.

कर्नाटक विधानसभेतून स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा काढण्‍याच्‍या काँग्रेसींच्‍या वक्‍तव्‍याचा विधान परिषदेत निषेध !

‘तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण’, असे म्‍हणणारे स्‍वातंत्र्यवीर सावरकर देशाचा मानबिंदू आहेत. २ वेळा काळ्‍या पाण्‍याची शिक्षा झालेले सावरकर एकमेव आहेत. त्‍यांनी मराठीची सेवा केली.

विधानसभेच्‍या माध्‍यमातून संसदीय लोकशाहीवरील विश्‍वास दृढ करण्‍यासाठी प्रयत्न करू ! – राहुल नार्वेकर, नवनियुक्‍त अध्‍यक्ष, विधानसभा

विधानसभेच्‍या माध्‍यमातून संसदीय लोकशाहीला बळकट करण्‍यासाठी सभागृहाची शिस्‍त पाळायला हवी. विधानसभेच्‍या माध्‍यमातून संसदीय लोकशाहीवरील विश्‍वास दृढ करण्‍यासाठी आपण प्रयत्न करूया..

जत (जिल्हा सांगली) येथे अफझलखानवधाचा फलक पोलीस अधिकार्‍यांनी केला जप्त !

‘सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांना शिक्षा’, हे पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. छत्रपतींनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढून सज्जन जनतेचे रक्षण करून वाईटाचा नाश केल्याचा जगप्रसिद्ध इतिहास असतांना असे फलक जप्त का करण्यात येत आहेत ?

चोरी झालेले मंदिर

प्रतिपंढरपूर असलेल्‍या डाळिंब बन (पुणे) येथील श्री विठ्ठल मंदिरामध्‍ये चोरी !

हिंदूंच्‍या मंदिरांमध्‍ये चोर्‍या आणि तोडफोड होणे, हे पोलिसांची अकार्यक्षमता दर्शवते ! पोलीस कधी सुधारणा करणार ?

विधान परिषद सभागृह नेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड !

विधान परिषदेचे सभागृहनेते म्‍हणून उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवड करण्‍यात आली आहे. मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्‍या वतीने सभागृहाच्‍या नेतेपदी एकनाथ शिंदे यांची नियुक्‍ती करण्‍यात असल्‍याची घोषणा सभागृहात केली.

महाराष्‍ट्रातील राजकीय संवाद वाढवण्‍यासाठी प्रयत्न व्‍हायला हवेत ! – देवेंद्र फडणवीस, मुख्‍यमंत्री

दक्षिणेकडील राज्‍यांमध्‍ये राजकीय पक्षांमध्‍ये शत्रुत्‍व असते. महाराष्‍ट्रात असे नाही; मात्र मागील ५ वर्षांत महाराष्‍ट्रात राजकीय संवादाचा अभाव झाला आहे. हा राजकीय संवाद वाढवण्‍यासाठी प्रयत्न व्‍हायला हवेत, अशी भावना मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्‍यक्‍त केली.

महाराष्‍ट्र विधानसभा अध्‍यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड !

महाराष्‍ट्र विधानसभेच्‍या अध्‍यक्षपदी ९ डिसेंबर या दिवशी भाजपचे आमदार अधिवक्‍ता राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड झाली. ८ डिसेंबर या दिवशी अध्‍यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांच्‍याकडून एकमात्र प्रस्‍ताव आला असल्‍यामुळे सभागृहात त्‍यांची बिनविरोध निवड झाली.

देशभरातील १५९ जिल्ह्यांतील सुमारे ६६ टक्के व्यावसायिक आस्थापनांनी गेल्या १२ महिन्यांत लाच दिली ! – सर्वेक्षणाचा निष्कर्ष

भारतात लाच दिल्याखेरीज लहान आणि मोठी अशी कोणतीच गोष्ट होत नाही, हे जगजाहीर आहे.

‘आचार्य बाळशास्‍त्री जांभेकर पत्रकार सन्‍मान योजने’चे निकष शिथिल होणार ! – मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘आचार्य बाळशास्‍त्री जांभेकर पत्रकार सन्‍मान योजने’चे निकष शिथिल करण्‍यात येतील, तसेच प्रतिमहा २० सहस्र रुपये सन्‍मान निधी देण्‍याच्‍या शासन निर्णयावर येत्‍या आठवड्यात कार्यवाही करण्‍यात येईल, अशी घोषणा राज्‍याचे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.