प्रशासनाने कारवाई न केल्यास कर्ली खाडीच्या पात्रात उतरून वाळूच्या अवैध उपशाला विरोध करू ! – वाघवणे ग्रामस्थांची चेतावणी
तालुक्यातील वाघवणे कर्ली खाडी येथे अवैधरित्या वाळू उत्खनन चालू आहे. याच्या विरोधात कारवाई न झाल्यास खाडीपात्रात उतरून वाळू उत्खननाला विरोध करावा लागेल, अशी चेतावणी वाघवणे येथील ग्रामस्थांनी तहसीलदार वर्षा झालटे यांना निवेदनाद्वारे दिली आहे.