Pakistani Ballistic Missile Program In Danger : पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र निर्मिती करणार्‍या आस्थापनांवर घातली बंदी !

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी सांगितले की, या आस्थापनांचा मोठ्या प्रमाणावर विनाशकारी शस्त्रांच्या प्रसारात सहभाग असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

भाजपच्या युवा मोर्चाचे मुंबईतील काँग्रेसच्या मुख्य कार्यालयावर आक्रमण !

भाजपच्या युवा मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी मुंबईतील काँग्रेसच्या मुख्य कार्यालयावर आक्रमण करून तोडफोड केली. या जमावाला पोलीस पांगवण्याचा प्रयत्न करत असतांनाच त्यांनी जमावावर लाठीमार केला.

प्राचार्य डॉ. विजय अनंत आठवले यांना ‘आंतरराष्ट्रीय विद्वान पुरस्कार’ प्रदान !

फिलिपिन्समधील ‘इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्री अँड अकॅडेमिक रिसर्च इन्कॉर्पोरेटेड’च्या (आय्.आय्.ए.आर.आय्.) वतीने सोलापूर, महाराष्ट्र येथील ‘वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’चे प्राचार्य डॉ. विजय अनंत आठवले यांना ‘आंतरराष्ट्रीय विद्वान पुरस्कार’ (‘इंटरनॅशनल ल्युमिनरी अवॉर्ड’) प्रदान करण्यात आला.

श्री तारकेश्वर महादेव मंदिरातील विटंबनेच्या प्रकरणी एकास अटक !

येथील येरळा नदीकाठावर असलेल्या श्री तारकेश्वर मंदिरामध्ये शिवलिंगाची विटंबना केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी एका संशयितास कह्यात घेतले आहे. अजय सोमलाल इवनाती (वय ३० वर्षे) रा. छिंदवाडा, मध्यप्रदेश असे संशयिताचे नाव आहे. तो मनोरुग्ण असल्याचे पोलिसांनी सांगितले.

डॉ. आंबेडकर यांच्या अवमानाच्या आरोपप्रकरणी महाविकास आघाडीचे नागपूर येथे आंदोलन !

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधीमंडळ नेते आणि आमदार आदित्य ठाकरे म्हणाले, ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान झाल्याचे आम्हाला वाटते, तसे नितीश कुमार, रामदास आठवले आणि सत्तेतील भाजपचे मित्रपक्ष यांना वाटत असेल, तर त्यांनी आंदोलन केले पाहिजे.’’

महाराष्ट्राच्या निवडणुकीत ‘व्होट जिहाद’साठी १०० कोटी रुपयांचा वापर ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

विधानसभा जिंकण्यासाठी विरोधकांनी ‘व्होट जिहाद’ची घोषणा दिली. मालेगाव येथील काही जणांच्या खात्यात ११४ कोटी रुपये जमा झाले. सिराज महंमद याने हे पैसे १४ खात्यांमध्ये वर्ग केले.

संसद भवनाच्या प्रवेशद्वारावर भाजप आणि काँग्रेस खासदारांची एकमेकांना धक्काबुक्की  

‘संसद म्हणजे कुस्तीचा आखाडा’ असे आता म्हटल्यास चुकीचे ठरू नये. असे खासदार जनतेपुढे काय आदर्श ठेवत आहेत, हे लक्षात येते !

ऐतिहासिक वास्तूंचे पावित्र्य भंग करणार्‍यांवर कठोर शिक्षेचे प्रावधान करावे ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते

कठोर शिक्षेच्या प्रावधानासमवेत तरुण पिढीमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण केल्यास ऐतिहासिक वास्तूंचे पावित्र्य भंग होणार नाही !

जिहाद्यांनी सद्गुरु बाळ महाराज यांना दिलेल्या धमक्यांविषयी कारवाई करून महाराजांना संरक्षण द्या !

१० डिसेंबरला इचलकरंजी शहरात बांगलादेशातील हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या निषेधार्थ ‘हिंदु न्याय यात्रा’ झाली. यात योगी संतोष उपाख्य सद्गुरु बाळ महाराज यांचे मार्गदर्शन झाले. यातील त्यांच्या बांगलादेशी मुसलमानांविषयी केलेल्या…

रशियामध्ये बंदी असणार्‍या आतंकवादी संघटनांना सूचीतून वगळण्याचा कायदा संमत

रशियाच्या संसदेने न्यायालयांना आतंकवादी संघटनांच्या सूचीतून कोणत्याही संघटनेला वगळण्याचा अधिकार देणारा कायदा संमत केला आहे.