(यवतमाळ) येथील २ धर्मांध बिर्याणीचालकांवर गुन्‍हा नोंद करून अटक !

सकल हिंदु समाजाकडून पोलिसांना गोमांस सापडल्‍याची माहिती

(प्रतिकात्मक छायाचित्र)

वणी (यवतमाळ), १५ जानेवारी (वार्ता.) – येथील लाल पूल परिसरातील २ मुसलमान बिर्याणी चालकांविरोधात गुन्‍हा नोंद करण्‍यात येऊन त्‍यांना पोलिसांनी अटक केली. मकरसंक्रांतीच्‍या दिवशी सकल हिंदु समाजाच्‍या कार्यकर्त्‍यांच्‍या लक्षात आल्‍यावर त्‍यांनी शीतकपाटात ३० ते ३५ किलो गोमांस असल्‍याचे पोलिसांना कळवले. पोलिसांनी सय्‍यद इम्रान सय्‍यद इस्‍माईल, आयफाज खान इब्राहिम खान या २ बिर्याणीचालकांना अटक केली. पाशा कुरेशी याच्‍यावरही गुन्‍हा नोंदवला आहे. ही कारवाई प्राणी संरक्षण कायद्यानुसार केली आहे. (गोवंश हत्‍याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही होत नसल्‍यानेच धर्मांधांकडून गोवंशियांच्‍या हत्‍या केला जातात. धर्मांधांना पोलिसांचा वचक उरला नसल्‍याचे यावरून लक्षात येते ! – संपादक)