श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची मोर्चाद्वारे मागणी
औरवाड (जिल्हा कोल्हापूर) – शिरोळ तालुक्यातील अवैध पशूवधगृह बंद करावे, तसेच गोहत्या बंद करावी, या मागण्यांसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने तहसीलदार कार्यावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आरले. हे निवेदन तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी स्वीकारले. ‘२ दिवसांत यावर कारवाई न झाल्यास पशूवधगृह तोडण्यात येईल’, अशी चेतावणी या वेळी देण्यात आली. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष श्री. रावसाहेब देसाई, मिरज येथील श्री. विनायक माईणकर, सांगली येथील अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे श्री. अंकुश गोडसे यांसह अन्य कार्यकर्ते, गोरक्षक उपस्थित होते.
गेल्या २ वर्षांपासून औरवाड भागातील जागेविषयी दावा न्यायप्रविष्ट असतांना त्या जागेवर अवैधरित्या बांधकाम करण्यात आले आहे. याच ठिकाणी गायींची कत्तल केली जाते, असा आरोप या प्रसंगी गोरक्षकांनी केला.
संपादकीय भूमिका :औरवाड येथील गोहत्या बंद करण्याची मागणी हिंदुत्वनिष्ठांना का करावी लागते ? प्रशासन स्वत:हून लक्ष का देत नाही ? |