कार्तिकी एकादशी विशेष बससेवेमधून पी.एम्.पी.ला ९८ लाख रुपयांचे उत्‍पन्‍न !

आळंदी येथील कार्तिकी एकादशी उत्‍सव आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज समाधी सोहळ्‍यासाठी पी.एम्.पी.कडून यात्रेकरूंच्‍या सोयीसाठी विशेष बससेवा उपलब्‍ध करून देण्‍यात आली होती.

न्यायमूर्ती जाधव आयोगाच्या अहवालात नावे असलेल्या नोटरींची सेवा बंद करणार ! – आलेक्स सिक्वेरा, कायदामंत्री, गोवा

नोटरींच्या सहभागाविना भूमी बळकावण्याचा घोटाळा होणे अशक्य आहे. भूमी बळकावल्याच्या प्रकरणी निवृत्त न्यायमूर्ती जाधव आयोगाच्या अहवालात नावे असलेल्या नोटरींची सेवा बंद करण्यात येईल, अशी चेतावणी कायदामंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी दिली आहे.

चिन्‍मय कृष्‍णदास यांची सुटका, तसेच बांगलादेशी हिंदूंचे रक्षण यांसाठी भारत सरकारने हस्‍तक्षेप करण्‍याची मागणी

भारत सरकारने तातडीने पावले उचलून चिन्‍मय कृष्‍णदास प्रभु यांची विनाअट सुटका व्‍हावी आणि अल्‍पसंख्‍यांक हिंदूंचे संरक्षणासाठी तेथील सरकारला भाग पाडावे, अशा मागणीचे निवेदन गडहिंग्‍लज येथे प्रांत कार्यालयात देण्‍यात आले.

दक्षिण गोवा समुद्रकिनार्‍यांवर आठवडाभरात भटक्या कुत्र्यांचे ३ पर्यटकांवर आक्रमण

मोबोर समुद्रकिनार्‍यावर २ विदेशी वयोवृद्ध पर्यटकांना गेल्या २ दिवसांत, तर बाणावली येथे गेल्या आठवड्याच्या शेवटी कर्नाटकस्थित एका पर्यटकाला भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला.

शिवप्रतापदिन उत्‍साहात साजरा करण्‍यासाठी सूक्ष्म नियोजन करा ! – जितेंद्र डुडी, जिल्‍हाधिकारी, सातारा

डुडी म्‍हणाले, ‘‘प्रतापगड येथे येणार्‍या पर्यटकांसाठी गडाचे संवर्धन आणि सुशोभीकरण यांसाठीच्‍या आराखड्याचे ‘थ्रीडी मॉडेल’ सिद्ध करावे. गडाची माहिती द्यावी. संवर्धनाच्‍या माध्‍यमातून गडाच्‍या परिसरामध्‍ये देण्‍यात येणार्‍या सुविधांची माहिती देण्‍यात यावी…..

वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील उदय प्रताप महाविद्यालयात नमाजपठणावरून वाद !

हिंदूंना धर्मनिरपेक्षतेचे डोस पाजणारे बुद्धीप्रामाण्‍यवादी आणि साम्‍यवादी यांना महाविद्यालयासारख्‍या विद्यादेवतेच्‍या मंदिरात पूजा-पाठ चालत नाही; मात्र नमाजपठण केलेले चालते, हे लक्षात घ्‍या!

देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमात अखंड हरिनाम दिंडीचे आगमन !

दिंडीच्‍या माध्‍यमातून षडरिपू निर्मूलन आणि व्‍यसन निर्मूलन यांच्‍या संदर्भात कार्य केले जाते. आश्रमात दिंडीचे स्‍वागत करण्‍यात आले. या प्रसंगी आश्रमात हरिद्वार येथील जुना आखाड्याचे मंडल श्री महंत ओम गिरीजी महाराज यांचीही वंदनीय उपस्‍थिती लाभली.

येशूने स्वप्नात सांगितल्यामुळे तोडफोड केल्याचा आरोपीचा दावा

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असतांना हिंदूंच्या संतांच्या पुतळ्याची तोडफोड होते. यातून कायदा आणि सुव्यवस्था यांची काय स्थिती आहे, हे स्पष्ट होते !

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : शपथविधीनिमित्त एस्.टी. बँकेकडून साखर-पेढे वाटप !; मद्यपीकडून पोलिसाला नोकरी घालवण्‍याची धमकी !…

‘चिंचवडचे आमदार माझ्‍या ओळखीचे आहेत’, असे सांगत नोकरी घालवण्‍याची धमकी दिल्‍याची घटना जुनी सांगवी येथे घडली. या प्रकरणी पोलीस अंमलदार प्रवीण पाईकराव यांनी दिलेल्‍या तक्रारीवरून विजय साठे याला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे.

बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि गोरक्षक यांनी जीव धोक्यात घालून गोवंशियांची वाहतूक करणारा ट्रक पकडला !

गोरक्षकांच्या जिवावर उठण्याइतपत उद्दाम झालेले गोतस्कर ! कायद्याचा धाक न राहिल्यामुळेच त्यांच्याकडून अशी कृती होत आहे !