‘हिंदु राष्ट्रासाठी स्वत:चे साहाय्य होईल’, अशी भूमिका घ्या ! – नितेश राणे, मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री, महाराष्ट्र

आपण विकसित राष्ट्राचे स्वप्न पहात असतांना काहीजण या हिंदुस्थानला वर्ष २०४७ पर्यंत ‘इस्लामी राष्ट्र’ करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वेळी शत्रूकडून होणार्‍या आक्रमणांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

पाटवळ, सत्तरी (गोवा) येथे वन्यप्राण्यांची शिकार करतांना एकाचा मृत्यू झाल्याचे प्रकरण

पाटवळ, सत्तरी येथे २४ डिसेंबरच्या मध्यरात्री वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी गेलेल्या तिघांपैकी एकाचा गोळी लागून मृत्यू झाल्याच्या घटनेच्या अन्वेषणाला वाळपई पोलिसांनी गती दिली आहे.

कळंगुट येथे रस्त्यावर अनधिकृतपणे बिर्याणी विकणार्‍यांवर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई

कळंगुट येथे रस्त्यावर अस्वच्छपणे आणि अनधिकृतरित्या बिर्याणी विकणार्‍यांवर ‘अन्न आणि औषध प्रशासना’ने (फूड अँड ड्रग ॲथॉरिटी’ने (‘एफ्.डी.ए.’ने) २७ डिसेंबर या दिवशी कारवाई केली. ‘एफ्.डी.ए.’चे अधिकारी रिचर्ड नोरोन्हा यांच्या नेतृत्वाखाली धाड घालण्यात आली.

पिंपरी येथे गुन्ह्यातून सराईत गुन्हेगाराचे नाव वगळणार्‍या पोलीस उपनिरीक्षकाचे निलंबन !

राजकीय दबाव आणणार्‍यांवर कोण कारवाई करणार ? त्यांच्यावरही कारवाई होणे आवश्यक ! राजकीय दबावामुळे पोलिसांना आपले कर्तव्य पार पाडण्यात तडजोड करावी लागत असेल, तर हे गंभीर आहे !

राज्याचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस न्याय देतील हा विश्वास आहे ! – पंकजा मुंडे, पर्यावरणमंत्री

पंकजा मुंडे यांचे मस्साजोग प्रकरणावर भाष्य !

साईबाबा संस्थानमध्ये बनावट दर्शन पास सिद्ध करणारा कर्मचारी सागर आव्हाडवर गुन्हा नोंद !

या घटनेनंतर प्रशासनाने नोंदवलेल्या तक्रारीनंतर सागर याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांची सांगली जिल्ह्यात शोधमोहीम राबवा ! – नितीन शिंदे, प्रदेशाध्यक्ष, हिंदु एकता आंदोलन

अशी मागणी का करावी लागते ?

‘सौर कृषी पंप योजने’च्या कार्यवाहीत महाराष्ट्र देशात प्रथम !

मार्च २०२४ पासून आतापर्यंत केवळ ८ मासांच्या कालावधीत राज्यात १ लाख ५८ सहस्र सौरपंप बसवण्यात आले असून सौर कृषी पंप योजनेच्या कार्यवाहीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे

राजकारणी आणि संत यांच्यातील नेमका भेद !

‘निवडणुकीच्या काळात राजकारणी ‘हे देऊ, ते देऊ’, असे सांगतात आणि फारच थोडे भौतिक सुख देतात. याउलट संत आणि सनातन संस्था सर्वस्वाचा त्याग करायला शिकवून चिरंतन आनंद देणारी ईश्वरप्राप्ती करून देतात.’