आळंदी (जिल्हा पुणे) – येथील श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात मकरसंक्रांतीनिमित्त परिसरातील लाखो महिला भाविकांनी माऊलींच्या मंदिरात श्रींचे दर्शन घेतले. ओवसा वहात आणि एकमेकींना ओवसा देत मंदिर प्रदक्षिणा करत श्रींना तिळाचा अभिषेक करण्यात आला. श्रींना हलव्याचे दागदागिने, पुष्प सजावट, वस्त्रालंकार परिधान केल्याने श्रींचे लक्षवेधी रूप सजले होते. मंदिर परिसरातील रस्ते महिलांच्या गर्दीने फुलले होते. मकरसंक्रांतीनिमित्त छोट्या व्यावसायिकांमुळे रस्त्याच्या दुतर्फा दुकाने थाटल्याने मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते.