सतत देव, धर्म आणि संत यांच्याविषयी बेताल वक्तव्य करणारे शरद पवार यांचा जाहीर निषेध !

‘देशाला रामायण, महाभारत यांची आवश्यकता नाही’, असे म्हणणारे मा. शरद पवार आता ‘समर्थ रामदासस्वामी हे छत्रपती शिवरायांचे गुरु नाही’, असे सांगतात.

(म्हणे) ‘रामदासस्वामी शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते !’ – शरद पवार

अनेक इतिहासतज्ञ आणि संशोधक यांनी समर्थ रामदासस्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु असल्याचे सोदाहरण अनेकदा सांगितले आहे. असे असतांना मूळ प्रश्‍नाला बगल देऊन वितंडवाद निर्माण करणारे विधान करून समाजात दूही माजवण्याचा हा प्रकार आहे, असे शिवप्रेमींना वाटल्यास चूक ते काय ?