Trump On Russia Ukraine Peace Talks : रशिया किंवा युक्रेन शांततेसाठी सिद्ध नसतील, तर आम्ही शांतता करारातून माघार घेऊ !

यापूर्वी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो म्हणाले होते की, जर येत्या काळात रशिया आणि युक्रेन यांनी युद्ध संपवण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही, तर अमेरिका शांततेचे प्रयत्न सोडून देईल.

Russia Attack On Indian Pharma Warehouse : आम्ही युक्रेनमधील भारतीय औषध आस्थापनाच्या गोदामावर क्षेपणास्त्र डागले नव्हते ! – रशियाचे ६ दिवसांनंतर स्पष्टीकरण

रशियाने ‘कुसुम’ नावाच्या एका भारतीय औषध आस्थापनाच्या गोदामावर १२ एप्रिल या दिवशी क्षेपणास्त्राद्वारे आक्रमण केल्याचा दावा युक्रेनच्या भारतातील दूतावासाने केला होता.

Russian Missile Strikes : युक्रेनमधील भारतीय औषध आस्थापनाच्या गोदामावर रशियाने केले आक्रमण

रशियाने केलेल्या क्षेपणास्त्र आक्रमणात युक्रेनमधील ‘कुसुम’ या भारतीय औषध आस्थापनाच्या गोदामाला आग लागली. भारतातील युक्रेनच्या दूतावासाने आरोप केला आहे की, ‘भारताशी विशेष मैत्री असल्याचा दावा करणारा रशिया जाणूनबुजून भारतीय आस्थापनांवर आक्रमण करत आहे.’

संपादकीय : युक्रेनला आरसा भेट द्या !

रशियाच्या शस्त्रांमध्ये भारतीय बनावटीचा एखादा भाग सापडल्यावर आक्षेप घेणार्‍या युक्रेनने दशकानुदशके भारतासह जगभरात आतंकवाद पसरवणार्‍या पाकिस्तानला शस्त्रे पुरवली आहेत….

Indian Equipment In Russia’s Arsenal :  रशियाच्या शस्त्रास्त्रांमध्ये भारतीय उपकरणे सापडल्याचा युक्रेनच्या सैन्यदलाचा दावा !

आतंकवादाचा पुरस्कार करणार्‍या देशाला शस्त्रास्त्रे पुरवणे युक्रेनला चालते का ? त्यामुळे रशियाच्या शस्त्रास्त्रांमध्ये भारतीय उपकरणे सापडल्यास युक्रेनला का झोंबते ?

Ukraine War : युक्रेनविरुद्धच्या युद्धात चिनी नागरिक रशियाच्या बाजूने लढत आहेत ! – युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की

रशिया सामाजिक माध्यमांद्वारे त्यांच्या सैन्यात चिनी नागरिकांची भरती करत आहे. रशियाच्या बाजूने लढणार्‍या १५५ चिनी नागरिकांची ओळख युक्रेनच्या गुप्तचर संस्थेने पटवली आहे. ही संख्या अधिकही असू शकते.

Former Russia President Warns Over Nuclear Race : अनेक देश अण्वस्त्र मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याने जग तिसर्‍या महायुद्धाच्या उंबरठ्यावर ! – दिमित्री मेदवेदेव, माजी राष्ट्राध्यक्ष, रशिया

त्यांनी जगातील वाढत्या अण्वस्त्र शर्यतीसाठी पाश्चात्त्य देशांना उत्तरदायी ठरवले आहे. ते म्हणाले की, पाश्चात्त्य देश युक्रेनमध्ये रशियाविरुद्ध छुपे युद्ध करत आहेत. जगात अण्वस्त्रांचा धोका वाढत आहे आणि परिस्थिती महायुद्धासारखी झाली आहे.

Russia Refuses US Proposal : युक्रेनसमवेतचे युद्ध संपवण्याच्या संदर्भातील अमेरिकेचा प्रस्ताव स्वीकारण्यास रशियाचा नकार

युद्ध संपवण्याच्या प्रयत्नात अमेरिका आणि रशिया यांच्यातील चर्चा रखडल्याचे यावरून दिसून येते.

Russia’s Shadow War : रशियाने अमेरिका आणि युरोप यांच्याविरुद्ध पुकारले आहे ‘शॅडो वॉर’ !

रशिया अमेरिका आणि युरोप यांच्याविरुद्ध सायबर आक्रमणे आणि हेरगिरी करत आहे. पाश्चात्त्य देशांकडून युक्रेनला मिळत असलेले साहाय्य कमकुवत करणे हा त्यामागील उद्देश आहे.

Former NATO commander Richard Shirreff : रशिया कधीही महायुद्ध चालू करू शकतो !

रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्ध संपवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. अमेरिका हे युद्ध संपवण्याचा प्रयत्न करत आहे.