Cyclone Dana : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची चेतावणी

भारतीय हवामान खात्याने बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकण्याची शक्यता वर्तवली आहे. या चक्रीवादळाचा परिणाम ओडिशा आणि बंगाल यांच्या किनारपट्ट्यांना जाणवेल, असेही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

भूमीची अवैध खरेदी रहित करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ

मंदिरांच्या भूमीकडे कुणी वक्रदृष्टीने पहाणार नाही, असा कायदा होण्यासाठी हिंदूंनी पुढकार घेतला पाहिजे !

रेल्वेमध्ये विनातिकीट प्रवास करणार्‍या ४०० पोलिसांवर दंडात्मक कारवाई !

अशा फुटक्या पोलिसांना रेल्वेत विनातिकीट प्रवास करू देणार्‍या रेल्वेच्या उत्तरदायी अधिकार्‍यांवरही कारवाई व्हायला हवी !

Dainik Sanatn Prabhat Effect : मुंबई महानगरपालिका दादर येथील अस्‍वच्‍छतेविषयी अधिकार्‍यांकडे विचारणा करणार !

दादरसारख्‍या मुंबईतील मध्‍यवर्ती रेल्‍वेस्‍थानकाच्‍या बाहेरील बाजारपेठेतील दुकानदार दुकानातील कचरा रात्री रस्‍त्‍यावर फेकत असल्‍याचा प्रकार दैनिक ‘सनातन प्रभात’मधून उघड करण्‍यात आला होता.

UPI in Maldives : मालदीवचे नागरिक आता भारतीय ‘यूपीआय’ वापरणार !

मालदीवचे नागरिक आता भारतीय ‘युनिफाइड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय) वापरू शकणार आहेत. यासाठी २ महिन्‍यांपूर्वी दोन्‍ही देशांमध्‍ये करार झाला होता. मालदीवचे राष्‍ट्रपती महंमद मुइज्‍जू यांनी २० ऑक्‍टोबरला वरिष्‍ठ मंत्र्यांच्‍या शिफारसींनंतर ‘यूपीआय’ चालू करण्‍यासाठी आवश्‍यक पावले उचलण्‍याचा निर्णय घेतला.

Nouf Marwai On YOGA : योगाभ्यास इस्लामच्या विरोधात नाही !

भारतातील योगाभ्यासच्या विरोधात असलेल्या धर्मांध मुसलमानांना चपराक ! यावर ते काय बोलतील का ?

Supreme Court on NCPCR : कायद्याचे पालन न करणारे मदरसे बंद करण्‍याच्‍या शिफारसीला सर्वोच्‍च न्‍यायालयाची स्‍थगिती

राष्‍ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने शिक्षण हक्‍क कायद्याचे पालन न केल्‍यामुळे सरकारी अनुदानित मदरसे बंद करण्‍याची शिफारस केली होती. या शिफारसीला सर्वोच्‍च न्‍यायालयाने स्‍थगिती दिली आहे.

Shimla Sanjauli Mosque : शिमला : संजौली मशिदीचे ३ अवैध मजले पाडण्यास मशीद समितीकडून आरंभ !

‘संघे शक्ति कलौ:युगे’नुसार हिंदू संघटित झाले आणि संघटनाची दिशा योग्य असेल, तर काय होऊ शकते?, हे यावरून लक्षात येते.

India Canada row : पंतप्रधान ट्रुडो यांनी राजकीय स्‍वार्थासाठी भारतासमवेतचे संबंध बिघडवले ! – संजय वर्मा, कॅनडातील भारताचे माजी उच्‍चायुक्‍त

कॅनडाचे पंतप्रधान जस्‍टिन ट्रुडो यांनी राजकीय स्‍वार्थाने आरोप केल्‍यामुळे भारताने कितीही सुनावले, तरी पंतप्रधान ट्रुडो यांच्‍यावर त्‍याचा काहीही परिणाम होणार नाही आणि ते आरोप करून राजकीय पोळी शेकत बसणार ! कॅनडाच्‍या जनतेनेच ट्रुडो यांना याविषयी जाब विचारणे आवश्‍यक आहे !

Kashmir terror attack : जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये आतंकवाद्यांच्‍या आक्रमणात एक डॉक्‍टर आणि ६ कामगार ठार

जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये नवीन सरकार स्‍थापन झाल्‍यावर लगेचच हे आक्रमण होते, याचा अर्थ ‘काश्‍मीरमध्‍ये लोकशाही मार्गाने कोणतीही व्‍यवस्‍था आम्‍ही चालू देणार नाही’, असेच आतंकवाद्यांना दाखवून द्यायचे आहे.