थोडक्यात महत्त्वाचे

भावेश भिंडे याला जामीन संमत !, ‘लिव्ह इन’मध्ये रहाणार्‍या महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न !, ६४ लाख रुपयांचा मद्यसाठा, गुटखा जप्त, मद्यपी पर्यटकांनी महिलेला चिरडले !, चांदवड येथे ढगफुटीसदृश्य पाऊस

गोदामातून २८० भ्रमणसंगणकांची चोरी

पोलिसांनी आतापर्यंत यातील ३ आरोपींना अटक केली असून १ आरोपी पसार आहे. भ्रमणसंगणकासह सर्व ऐवजाचे मूल्य १ कोटी १ लाख रुपये आहे.

राज्यात विविध प्रकल्पांना ग्रामस्थांचा तीव्र विरोध !

थिवी येथील ग्रामसभेत पुणेस्थित खासगी विद्यापीठ प्रकल्पाला मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला. या प्रकल्पाला विरोध करणारा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला.

मुंबई महापालिकेकडून कंत्राटदाराला ८ कोटी रुपयांचा दंड

दिलेल्या मुदतीत कचर्‍याची विल्हेवाट कंत्राटदारांकडून लावली जात आहे का ? हे पहाण्याचे दायित्व कुणाचे ? ते पार न पाडणार्‍यांवरही कारवाई व्हायला हवी !

कोंढवा येथे वाहतूककोंडी सोडवणार्‍या वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की !

कायद्याचे भय न उरल्याने समाजात अशा घटना वारंवार घडत आहेत, हे दुर्दैवी !

सनातन संस्थेच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सवात विविध माध्यमांतून उत्तरप्रदेश आणि बिहार येथे करण्यात आला धर्मप्रसार !

नुकत्याच पार पडलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या कालावधीत उत्तरप्रदेशातील कानपूर, अयोध्या, भदोही, तसेच बिहार राज्यातील समस्तीपूर आणि गया येथे प्रवचनांचे आयोजन करण्यात आले. या प्रवचनांमधून देवी पूजनाशी संबंधित शास्त्रीय माहिती देण्यात आली.

सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांतील वृक्षतोड रोखण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना

संपूर्ण दोडामार्ग तालुका आणि सावंतवाडी तालुक्यातील १२ गावे येथे वृक्षतोड करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या क्षेत्रात अवैधरित्या होणार्‍या वृक्षतोडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘सावंतवाडी-दोडामार्ग टास्क फोर्स समिती’ सिद्ध  करण्यात आली आहे.

पुणे येथील बोपदेव घाटातील पीडित तरुणीला ‘मनोधैर्य’ योजनेतून ५ लाख रुपयांचे साहाय्य !

‘मनोधैर्य’ योजनेतून हानीभरपाई मिळावी म्हणून तरुणीने ‘विधी सेवा प्राधिकरणा’कडे अर्ज केला होता. अर्ज केल्यानंतर अर्जाला केवळ ९ दिवसांमध्ये मान्यता देण्यात आली आहे.

संकष्टी चतुर्थीदिनी सहस्रो भाविकांनी श्री क्षेत्र ओझर (पुणे) येथील श्री विघ्नहराचे घेतले दर्शन !

अष्टविनायकांतील मुख्य स्थान असलेल्या श्री क्षेत्र ओझर येथे श्रीगणेश मंदिरामध्ये संकष्टी चतुर्थीच्या निमित्त महाआरती करण्यात आली. पहाटे ५ ते रात्री ११ पर्यंत रांगेत अनुमाने ५० सहस्र भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

सायबर चोरट्यांनी केली ३ कोटी रुपयांची फसवणूक !

पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे सायबर चोरट्यांचा सुळसुळाट होणे हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद !