कारखाने आणि हॉटेलचालक यांनी कचरा उघड्यावर टाकल्यास कठोर कारवाई करणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
औद्योगिक कारखाने आणि हॉटेलचालक त्यांचा कचरा गावाच्या वेशीवर आणून टाकत आहेत. अशा प्रकारांत वाढ झालेली आहे आणि हे प्रकार त्वरित थांबवावे, अन्यथा सरकार संबंधितांची वीज आणि पाणी यांची जोडणी तोडणे अन् आस्थापनांना टाळे ठोकणे, अशी कठोर कारवाई करणार आहे.