‘आदि जैन युवक ट्रस्ट’च्या वतीने ‘गो-निवास शेड’चे पुणे येथे लोकार्पण !

अवैध कत्तल रोखून पोलीस विभागाने पकडलेल्या गोवंशियांची रवानगी गोशाळेत करण्यात येत आहे. यामुळे गोशाळेमध्ये असे गोधन सांभाळण्यासाठी वाढीव पशूआवासाची तातडीने आवश्यकता भासत आहे.

माजी खासदार पूनम महाजन यांची सामाजिक संस्थांच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या समवेत बैठक !

पश्चिम महाराष्ट्र दौर्‍यांतर्गत भाजपच्या राष्ट्रीय नेत्या माजी खासदार पूनम महाजन यांचे कोल्हापूर येथे आगमन झाले. या वेळी कोल्हापूर उत्तर-दक्षिण विधानसभा क्षेत्रातील सामाजिक संस्थांच्या प्रमुख कार्यकर्त्यांसोबत छत्रपती राजाराम चौक येथे बैठक पार पडली.

चोपडा येथे ‘हिंदु रक्षा समिती’च्या वतीने शस्त्रपूजन कार्यक्रम पार पडला !

छत्रपती शिवाजी महाराज चौकात ‘हिंदु रक्षा समिती’च्या वतीने शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शस्त्रपूजन करण्यात येऊन आलेल्या हिंदु धर्माभिमान्यांनी शस्त्रपूजन केले.

रायरेश्वर येथे दुर्ग स्वच्छता आणि संवर्धन मोहीम !

‘श्री शिवमुद्रा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य’ या दुर्गसेवक संस्थेच्या अंतर्गत १४ वी स्वच्छता, संवर्धन मोहीम श्रीमान रायरेश्वर येथे १४ ऑक्टोबरला राबवण्यात आली. या वेळी २०० युवक-युवती यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

हिंदु धर्मावर होणारे विविध आघात रोखण्यासाठी जनजागृती महत्त्वाची ! – सदगुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

हिंदूंच्या समस्यांविषयी सातत्याने हिंदु समाजामध्ये जागृती घडवून आणून त्याचा हिंदूंनी संघटितपणे प्रतिकार केला पाहिजे, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले.

विजयादशमीनिमित्त मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांत ठिकठिकाणी शस्त्रपूजन !

सर्वत्रच्या हिंदूंनी विजयादशमी उत्साहात साजरी केली. प्रथेनुसार या दिवशी ठिकठिकाणी शस्त्रपूजन करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांत शस्त्रपूजन करण्यात आले.

पुणे येथे नवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने आयोजित उपक्रमांना देवीभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

या वर्षी ‘महिला सशक्तीकरण’ या उपक्रमाच्या अंतर्गत महिलांना शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी स्वसंरक्षणाची आवश्यकता अन् लव्ह जिहाद सारखी संकटे यांविषयी माहिती देऊन जागृती करण्यात आली.

Opposition Boycott Waqf Bill JPC : वक्फ बोर्डाच्या संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत हिंदु संघटनांना बोलावल्यावरून विरोधकांचा बहिष्कार !

बैठकीत कुणाला बोलवायचे आणि कुणाला नाही, याचा अधिकार केंद्र सरकार नियुक्त संसदीय समितीला असल्याने यावरील आक्षेप चुकीचाच होय !

सुधागड (जिल्हा रायगड) येथे २ गाभण गायी आणि २ कालवडी यांची हत्या !

गोवंशहत्या बंदी कायदा अस्तित्वात असतांनाही अशा प्रकारे गोवंशियांची हत्या केली जाणे संतापजनक ! अशा आरोपींना कठोर शिक्षा झाल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !

मिरज येथे हिंदुत्वनिष्ठांकडून ४९ गोवंशियांची सुटका !

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही गोरक्षक, हिंदुत्वनिष्ठ यांनाच गोरक्षणासाठी प्रयत्न करावे लागणे पोलिसांना लज्जास्पद ! आरोपींना कठोर शिक्षा केल्यासच अशा घटनांना आळा बसू शकेल !