भिवंडी येथे नवरात्रोत्सव शांततेत पार पडण्यासाठी पोलीस सतर्क !

भिवंडी येथे अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीवर धर्मांधांकडून दगडफेक करण्यात आली होती. यानंतर तिथे तणाव निर्माण झाला होता. नवरात्रोत्सवात या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ठाणे पोलिसांनी भिवंडी येथील शहरी आणि ग्रामीण कडक बंदोबस्त तैनात केला आहे.

लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता दिवाळीपूर्वीच मिळणार !

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता दिवाळीपूर्वीच बहिणींच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. नोव्हेंबरमध्ये दिवाळी असल्याने त्याआधीच पैसे जमा करून लाडक्या बहिणींना भाऊबिजेची भेट मिळणार आहे

कॉन्व्हेंट शाळेतील अत्याचारी शिक्षकावर गुन्हा नोंद !

बलात्कारी पदाधिकारी ठेवणार्‍या काँग्रेसला येत्या निवडणुकीत धडा शिकवा ! शिक्षण क्षेत्राला कलंक ठरणार्‍या अशा शिक्षकांना बडतर्फच करायला हवे !

ठाणे येथे सावत्र वडिलांकडून लैंगिक अत्याचार, तर सावत्र मेहुण्याकडून मारहाण

२६ वर्षीय मुक्या आणि पायाने अपंग असणार्‍या मुलीवर सावत्र वडिलांकडून वर्षभर लैंगिक अत्याचार, तर सावत्र बहिणीच्या नवर्‍याकडून मारहाण होत असल्याचा प्रकार ठाण्यात घडला आहे.

हिंदु धर्म हा जगाला मानवतेचा संदेश देणारा धर्म ! – शरद पोंक्षे, स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक

हिंदी राष्ट्रवाद हा मुसलमानांचे लांगूलचालन करणारा होता. हिंदु राष्ट्रवाद सोडून हिंदी राष्ट्रवाद देशाचे भले करू शकत नाही, हे सावरकरांनी ओळखले होते. हिंदी राष्ट्रवाद देशाचे तुकडे केल्याविना रहाणार नाही, हे सावरकर यांनी वर्ष १९३७ मध्येच सांगितले होते. त्यांचे हे विधान १९४७ मध्ये खरे ठरले.

शाळेचे अध्यक्ष आणि सचिव तुषार आपटे यांना जामीन, तर दुसर्‍या प्रकरणात अटक

येथील नामांकित शाळेतील विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचार प्रकरणात सहआरोपी असलेले शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना ४४ दिवसानंतर अटक करण्यात आली.

अल्पवयीन आरोपीचे वय १८ वरून १४ करायला हवे ! – अजित पवार

अल्पवयीन आरोपीचे वय १८ वरून १४ करायला हवे. याविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेत चर्चा करणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : १८ वर्षांच्या मुलाचा बिबट्याच्या आक्रमणात मृत्यू !; मुंबईत इमारतीचे छत कोसळले !

१८ वर्षांच्या मुलाचा बिबट्याच्या आक्रमणात मृत्यू ! नंदुरबार – अंबापूर-राणीपूर रस्त्यावर रोहित मोरे (वय १० वर्षे) बकर्‍यांना चरायला घेऊन गेला होता. त्या वेळी अचानक बिबट्याने आक्रमण करून रोहितला उसाच्या शेतात फरफटत नेले. यात रोहितचा मृत्यू झाला. १५ दिवसांपूर्वी राणीपूर ग्रामस्थांनी परिसरात बिबट्याचा वावर असल्याने वन विभागाकडे पिंजरा लावण्याविषयी विनंती केली होती. ‘वन विभागाने पिंजरे लावले … Read more

‘ताज हॉटेल’ प्रकल्प क्षेत्रातून ९ हेक्टर गावठाण क्षेत्र वगळण्यासाठी वेळागरवासियांचे खाडीपात्रात आंदोलन !

यावरून प्रशासनाला आंदोलनाचीच भाषा समजते, असे समजायचे का ?