मोहनदास गांधी यांचा मृत्यू अपघाती

ओडिशा सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने मोहनदास गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त दोन पानी पुस्तिका प्रकाशित केली होती. या पुस्तिकेत गांधी यांचा ३० जानेवारी १९४८ या दिवशी अपघाती मृत्यू झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

‘अग्नी-२’ क्षेपणास्त्राची रात्रीची चाचणी यशस्वी

येथील ‘अग्नी-२’ या जमिनीवरून जमिनीवर मारा करणार्‍या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची घेतलेली रात्रीची चाचणी १७ नोव्हेंबरला यशस्वी झाली. हे क्षेपणास्त्र प्रथमच रात्रीच्या वेळी प्रक्षेपित करण्यात आले.

मुसलमानांना दिलेली भूमी आतंकवाद्यांचे मुख्य ठिकाण होईल !

हिंदू आणि मुसलमान शांततेत राहावेत म्हणूनच भारत अन् पाकिस्तान वेगवेगळे झाले. प्रत्यक्षात या दोन्ही देशांमध्ये सध्या शांतता नाही. पाकिस्तान आतंकवाद्यांचा केंद्रबिंदू झाला आहे, असे स्वतः पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मान्य केले आहे. असे असतांना सर्वोच्च न्यायालयाने सुन्नी वक्फ बोर्डाला ५ एकर भूमी देणे हे दुर्दैवी आहे.

भुवनेश्‍वर (ओडिशा) येथील आध्यात्मिक पुस्तक मेळ्यात सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

येथे १९ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत ‘गुंडीचा आध्यात्मिक पुस्तक मेळ्या’त सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. याला जिज्ञासूंचा उत्तम प्रतिसाद लाभला.

(म्हणे) ‘भूत दाखवा आणि ५० सहस्र मिळवा !’

कुठे भूत, अनिष्ट शक्तींवर विश्‍वास ठेवणारे पाश्‍चात्त्य देश आणि कुठे भारतातील निधर्मी शासकीय अधिकारी ! जिल्हाधिकार्‍यांनी असे आवाहन करण्यापेक्षा गावकर्‍यांना धर्मशिक्षण कसे मिळेल ?, यासाठी प्रयत्न करून श्रद्धासंवर्धन करावी !

फटाके फोडल्यावरून झालेल्या वादात भुवनेश्‍वरमध्ये युवकाची तलवारीने हत्या !

येथील बीडीए कॉलनीचा रहिवासी अमरेश नायक याची २७ ऑक्टोबर या दिवशी फटाके फोडल्याच्या कारणावरून हत्या करण्यात आली. ही घटना शहरातील एअरफील्ड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणार्‍या सुंदरपाडा क्षेत्रात घडली.