दैनिक ‘सनातन प्रभात’मधील वृत्ताचा परिणाम !
श्री. प्रीतम नाचणकर, विशेष प्रतिनिधी, दैनिक सनातन प्रभात
मुंबई, २१ ऑक्टोबर (वार्ता.) : दैनिक ‘सनातन प्रभात’च्या २० ऑक्टोबर २०२४ या दिवसाच्या अंकात पृष्ठ क्रमांक १ वर ‘दादर बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावर प्रतिदिन सकाळी फेकला जातो कचरा’, हे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या संकेतस्थळावरही हे वृत्त प्रसिद्ध करून दादर (पूर्व) रेल्वेस्थानकाच्या बाहेरील अस्वच्छतेची छायाचित्रेही देण्यात आली होती. हे ऑनलाईन वृत्त दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या ‘एक्स’ खात्यावर पाठवले होते. यावर मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून संबंधित प्रभागातील अधिकार्यांना बोलावून याविषयीची माहिती घेण्यात येणार असल्याचे कळवले आहे.
दैनिक सनातन प्रभातमधील प्रसिद्ध झालेले वृत्त –
१. मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून हे वृत्त तक्रार निवारण विभागाकडे कार्यवाहीसाठी पाठवण्यात आल्याचे कळवले आहे.
२. दादरसारख्या मुंबईतील मध्यवर्ती रेल्वेस्थानकाच्या बाहेरील बाजारपेठेतील दुकानदार दुकानातील कचरा रात्री रस्त्यावर फेकत असल्याचा प्रकार दैनिक ‘सनातन प्रभात’मधून उघड करण्यात आला होता. दादर (पूर्व) रेल्वेस्थानकाच्या बाहेर डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मुख्य मार्गाकडे जाणारा रस्ता, हिंदमाता बाजारपेठेत जाणारा रस्ता, श्री स्वामीनारायण मंदिराकडे जाणारा रस्ता या सर्व मार्गांवर दुकानदारांनी टाकलेल्या कचर्याची विविध छायाचित्रे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या संकेतस्थळावरून प्रसारित करण्यात आली होती.
https://t.co/56XHayEGCQ
🤔#Mumbai स्वच्छ कधी होणार ? 🤫#Deep_Clean_Drive😡#Dadar बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावर प्रतिदिन सकाळी फेकला जातोे कचरा !@mieknathshinde @MPLodha @dvkesarkar @mybmc pic.twitter.com/25cFRYA5sU
— pritam nachankar (@pritamppn1985) October 19, 2024
३. हे वृत्त आणि याविषयीची छायाचित्रे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने महानगरपालिकेच्या अधिकृत ‘एक्स’ खात्यावर पाठवली होती. त्यावर प्रशासनाने वरील स्वरूपाची माहिती कळवली आहे.
४. मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून घोषित करण्यात आलेल्या ‘स्वच्छ मुंबई’ या मोहिमेच्या अंतर्गत प्रत्यक्षात कार्यवाही होत नसल्याचे या वृत्ताद्वारे दैनिक ‘सनातन प्रभात’मधून निदर्शनास आणून देण्यात आले होते. यावर मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून कळवण्यात आलेल्या उत्तरानुसार प्रत्यक्षातही दादर बाजारपेठेचा परिसर स्वच्छ रहाण्याच्या दृष्टीने प्रशासन कार्यवाही करणार का ?, हे पहावे लागणार आहे.