तणावमुक्तीसाठी स्वभावदोष निर्मूलन करणे आवश्यक ! – कु. मनीषा माहूर

आज व्यक्ती, कुटुंब, कार्यालय, समाज सर्वत्र तणाव आहे. तणावामुळे मनुष्य दुःखी होतो आणि जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही. सध्या विद्यार्थ्यांमध्येही तणाव दिसून येतो. अशा स्थितीत शिक्षकही तणावात रहातात.

शिरस्त्राण परिधान न केलेल्या दुचाकीचालकाची अनुज्ञप्ती रहित करणार ! – गोवा पोलीस

शिरस्त्राण परिधान न करता दुचाकी चालवणार्‍यांच्या विरोधात गोवा पोलिसांनी व्यापक मोहीम आरंभली आहे. या अंतर्गत शिरस्त्राण परिधान न करता दुचाकी चालवणार्‍या १०० जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दादर रेल्‍वेस्‍थानकाबाहेरील रस्‍त्‍याला मद्यपींच्‍या अड्डयाचे स्‍वरूप !

रस्‍त्‍याची अशी स्‍थिती होणे मुंबईसारख्‍या शहरासाठी लाजिरवाणे !

जैन विकास आर्थिक महामंडळावरील श्वेतांबर जैन सदस्यांच्या निवडीला दिगंबर जैन समाजाचा विरोध !

राज्यात ‘जैन आर्थिक विकास महामंडळा’वर श्वेतांबर जैन समाजातील लोकांची सदस्य म्हणून राज्यशासनाने निवड केल्यानंतर ही निवड दिगंबर जैन समाजाला अमान्य आहे. श्वेतांबर जैन समाजातील व्यक्तींची सदस्यपदी निवड केल्यानंतर दिगंबर जैन समाजाने त्याला तीव्र विरोध केला आहे.

Railway Reservation : आता १२० दिवसांआधी नव्‍हे, तर ६० दिवसांआधी मिळणार आरक्षण !

रेल्‍वे मंत्रालयाने तिकीटाच्‍या आरक्षणाच्‍या नियमात पालट करत आता ते १२० दिवसांआधी नव्‍हे, तर ६० दिवसांआधी (प्रवासाचा दिवस सोडून) मिळणार असल्‍याची माहिती दिली.

नवी मुंबईच्या अतिरिक्त आयुक्तपदी डॉ. अमोल शिंदे

महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी डॉ. अमोल शिंदे यांची शासनाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. मागील अनेक महिन्यांपासून शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त २ या पदांचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता.

(म्‍हणे) ‘जे झाले ते होणारच होते !’

असे उघडपणे सांगणार्‍यांना पोलिसांनी कारागृहात डांबले पाहिजे ! या विधानांतून धर्मांधांची हिंदूंच्‍या प्रती कशी मानसिकता आहे, हे हिंदूंच्‍या आतातरी लक्षात येऊन आत्‍मघाती धर्मनिरपेक्षतेला ते तिलांजली देतील, हीच अपेक्षा !

स्वच्छता अभियानात कोल्हापूर जिल्ह्यातील शेळकेवाडी ग्रामपंचायत प्रथम !

‘संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियाना’च्या वर्ष २०२२-२३ अंतर्गत विभागस्तरीय समितीने केलेल्या पडताळणीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील शेळकेवाडी ग्रामपंचायतीला प्रथम पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे

‘थकित पाणीदेयक अभय योजने’त १६ कोटीहून अधिक रकमेची वसुली

थकबाकीदार ग्राहकांकडून ५० कोटींहून अधिक रकमेची थकबाकी येणे शिल्लक होती. यावर २१ कोटी ५९ लाख विलंब शुल्क आणि ९९ लाख ५९ सहस्र रुपये दंडात्मक रक्कम अशी मिळून ७३ कोटी ७३ लाख रुपये येणे बाकी होते.

जयसिंगपूर (कोल्हापूर) : हिंदुत्वनिष्ठांनी जाब विचारताच भगवा ध्वज परत उभारला !

जाब विचारल्यावर लगेचच प्रशासनाने हा भगवा ध्वज हिंदुत्वनिष्ठांना परत दिला. त्यानंतर हिंदुत्वनिष्ठांनी हा ध्वज पूर्ववत् क्रांती चौकात दिमाखात फडकावला.