दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : सोनसाखळी चोरणारे २ धर्मांध अटकेत !; मर्सेडिसने चिरडल्याने तरुणाचा मृत्यू !

गुन्हेगारीत पुढे असणार्‍या धर्मांधांना कठोर शिक्षाच करायला हवी !

मालगाव (सांगली) येथील माहिती अधिकार्‍याला ठोठावला २५ सहस्र रुपयांचा दंड !

अशा अकार्यक्षम अधिकार्‍यांवर आणखी कठोर कारवाई व्हाती, असेच जनतेला वाटते.

आज आचारसंहितेचा बाऊ केला जात आहे ! – धनंजय देसाई, हिंदु राष्ट्र सेना

येणार्‍या निवडणुकीत हिंदूंनी पैसे घेऊन, तसेच अन्य आमीषांना बळी पडून त्यांचे मत विकू नये. आपण जिजामातेचे पाईक आहोत, हे हिंदूंनी नेहमी लक्षात ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन हिंदुराष्ट्र सेनेचे संस्थापक श्री. धनंजय देसाई यांनी केले.

विधी महाविद्यालय रस्त्यावर चंदन चोरट्यांकडून पोलिसांवर आक्रमण !

पोलीस असतांना चंदन चोरी करणारे पळून जातात, हे पोलिसांसाठी लज्जास्पद ! अशामुळे चंदन चोरीच्या घटना वाढणार नाहीत, तर काय होणार ?

भाजप नेते राजकुमार बडोले यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश !

भाजप नेते आणि माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी सहकार्‍यांसह २२ ऑक्टोबर या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

पिंपरी (पुणे) येथे धर्मांधांकडून पर्यटनाच्या बहाण्याने घरमालकाचे अपहरण !

सर्वच ठिकाणी वाढत असलेल्या धर्मांध गुन्हेगारांना कठोर शिक्षा होत नसल्याने त्यांची गुन्हेगारी वृत्ती वाढत आहे. पोलिसांचा धाकही संपल्याचे लक्षण आहे.

दिवाळीनिमित्त खासगी ट्रॅव्हल्सच्या प्रवासी भाड्यांमध्ये दुप्पटीने वाढ !

हिंदूंच्या सणांच्या वेळी प्रवासी भाडेवाढ करणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांवर कुणाचा वचक नसणे संतापजनक !

खेड-शिवापूर (पुणे) टोलनाका परिसरातून एका चारचाकी गाडीतून ५ कोटी रुपये जप्त !

निवडणुकीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर सर्वत्र होणारे अपप्रकार व्यवस्थेचे अपयश दर्शवतात ! प्रलोभने देऊन मतदान होत असेल, तर लोकशाही कशी टिकणार ?

छत्रपती शिवाजी महाराजांवरील ‘श्री शिवप्रताप’ या ओवीबद्ध शिवचरित्र पारायणास प्रारंभ !

‘गीता परिवार’चे संस्थापक प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी ‘संपूर्ण महाराष्ट्रभर या पवित्र श्री शिवचरित्राची १ लाख पारायणे व्हावीत’, अशी इच्छा व्यक्त केली होती.

जत (सांगली) तालुक्यातील उमदी येथे आंतरराष्ट्रीय जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड !

पोलिसांनी आतापर्यंत जुगार अड्ड्यांवर जुजबी कारवाई केल्यामुळे ठराविक दंड भरल्यानंतर पुन्हा हे जुगार अड्डे चालू होतात. जुगार अड्डे चालूच होऊ नयेत, यासाठी पोलिसांनी स्वत:चे कर्तव्य पार पाडले पाहिजे !