कल्याण येथे परप्रांतीय कुटुंबाकडून मराठी कुटुंबाला मारहाण !

कल्याण – येथील एका परप्रांतीय कुटुंबाकडून मराठी कुटुंबाला पुन्हा एकदा पुष्कळ मारहाण करण्यात आली आहे. उत्तम पांडे आणि त्याची पत्नी यांनी ही मारहाण केली. या घटनेत तिघेजण घायाळ झाले आहेत. ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाली आहे. मारहाण करणार्‍यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मारहाण झालेला तरुण पोलीस कर्मचारी आहे. ४ वर्षांच्या मुलीचा विनयभंग करण्यात आला होता, याविषयी खडसावण्यासाठी गेलेल्या कुटुंबाला पांडे आणि त्याच्या पत्नीने मारहाण केली.

संपादकीय भूमिका :

मराठी लोक किती काळ असा मार खात रहाणार आहेत ?