प्रयागराज महाकुंभपर्व २०२५
प्रयागराज, २२ डिसेंबर (वार्ता.) – तीर्थराज प्रयागराज येथे १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीत होणार्या महाकुंभपर्वात ‘सनातन संस्था वाराणसी’च्या प्रदर्शन कक्षाच्या भूमीचे पूजन २२ डिसेंबर या दिवशी करण्यात आले. आरंभी श्री गणेश, श्री गुरु, गंगामाता भूमाता आणि कुंभस्थित देवता यांचे आवाहन करण्यात आले. यानंतर भूदेवतेचे पंचोपचार पूजन करण्यात आले. शेवटी सनातनच्या ध्वजाचे आरोहण करण्यात आले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांची वंदनीय उपस्थिती लाभली, अशी माहिती सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी दिली.
या वेळी श्री. चेतन राजहंस म्हणाले, कुंभक्षेत्रात सेक्टर १९ मध्ये मोरी मार्गावर सनातन संस्था वाराणसीचे आध्यात्मिक शिबीर असणार असून या ठिकाणी धर्मशिक्षण देणारे भव्य प्रदर्शन, तसेच सनातनच्या धर्म, अध्यात्म आदींविषयीच्या ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात येणार आहे.