शिरूर (जिल्हा पुणे) – तालुक्यातील कारेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मुलींसोबत गैरवर्तन केल्याविषयी ५२ वर्षीय अनिल शेळके या शिक्षकावर रांजणगाव एम्.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात आली आहे. (असे वासनांध शिक्षक विद्यार्थ्यांवर काय संस्कार करणार ? – संपादक) विद्यार्थिनींनी पालकांना घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पालक, शाळेतील इतर शिक्षक, मुख्याध्यापक यांच्याशी चर्चा करून पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.
आरोपी शेळके हा शाळेतील मुलींना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणे, मुलींच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करत होता. शाळेतील अल्पवयीन मुलींसोबत गैरकृत्य करत असतांना कुणालाही न सांगण्याची धमकी देत असल्याचे विद्यार्थिनींनी पालकांना सांगितले.
संपादकीय भूमिका :समाजाची नीतिमत्ता, नैतिकता रसातळाला गेल्याचे उदाहरण ! |