डिचोली येथील केंद्रात प्रश्नपत्रिकेसमवेत उत्तरपत्रिकाही देण्यात आली !
शिक्षकाच्या सतर्कतेमुळे उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत पोचल्या नाहीत
शिक्षकाच्या सतर्कतेमुळे उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत पोचल्या नाहीत
शिवसेना उद्धव ठाकरे गट यांनी विधानसभा निवडणुकीसाठीच्या ६५ उमेदवारांची पहिली सूची घोषित केली आहे. यात नवे आणि जुने उमेदवार आहेत. काँग्रेसच्या काही मतदारसंघांमध्येही उद्धव ठाकरेंच्या पक्षाने उमेदवार दिले आहेत.
१० सहस्र बेकायदेशीर बांधकामे झाली आहेत, ती होत असतांना तुम्ही काय करत होतात ? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने नवी मुंबई महापालिकेला विचारला आहे. येथील बेकायदेशीर बांधकामांच्या विरोधात जनहित याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी माफीचा साक्षीदार होऊ देण्याच्या मागणीसाठी केलेला अर्ज विशेष न्यायालयाने २३ ऑक्टोबरला फेटाळला.
राज्यातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे यांच्या विरोधात मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती भारत देशपांडे या द्विसदस्यीय न्यायपिठाने स्वेच्छा याचिका नोंद करून घेतली आहे. या प्रकरणी गेले २ दिवस न्यायालयात सुनावणी चालू आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ‘घड्याळ’ चिन्हावर निवडणूक लढवण्यास संमती देऊ नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून सर्वाेच्च न्यायालयात याचिका केली होती. २४ ऑक्टोबर या दिवशी सर्वाेच्च न्यायालयाने याचिका फेटाळली आहे.
पाकमध्ये हिंदु आणि शीख यांचे रक्षण होणार आहे का ?, हाच मूळ प्रश्न आहे !
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचा कट पुणे येथील कर्वेनगर भागात रचल्याचे अन्वेषणात उघड झाले आहे. या प्रकरणात लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित प्रवीण लोणकरला अटक केली आहे.
निवडणुकीमध्ये धार्मिक ध्रुवीकरण रोखण्यासाठी ‘महाविकास आघाडी’ला पाठिंबा देण्याचा निर्णय ‘सामाजिक सलोखा ऐक्य परिषदे’त घेण्यात आला आहे, अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष मुफ्ती अहमद हसन कासमी यांनी दिली.
इस्लामी देशांवर जेव्हा आतंकवादी आक्रमण होते, तेव्हा ते लगेचच संबंधित आतंकवाद्यांच्या ठिकाणांवर अन्य देशांतील ठिकाणांवर आक्रमण करतात; मग भारत पाकिस्तानवर असे आक्रमण का करत नाही ?