Dabur : ‘डाबर’ आस्थापनाच्या पॅकेट बंद मोसंबी ज्यूसमध्ये काळी बुरशी !
हिमाचल प्रदेशाच्या ग्राहक मंचाने ‘डाबर इंडिया लिमिटेड’ या आस्थापनाला ग्राहकाला तिच्या पॅकेट बंद फळांच्या रसामध्ये (ज्यूसमध्ये) काळी बुरशी आढळल्याने आणि त्यामुळे उपवास मोडल्याने पीडित ग्राहकाला ७० सहस्र रुपयांची हानीभरपाई देण्याचा आदेश दिला.