शिवसेनेच्या ४५ उमेदवारांची नावे घोषित !

विधानसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने २२ ऑक्टोबरला रात्री विलंबाने ४५ उमेदवारांची नावे घोषित केली आहेत.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : पाळीव कुत्र्याची हत्या करणारा कह्यात ! ; कोंबड्यांच्या विष्ठेमुळे माशा वाढून विद्यार्थी आजारी !

पुणे येथे तरुणाने स्वतःच्या पाळीव कुत्र्याची निर्घृणपणे हत्या केली आहे. या प्रकरणी त्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याला कह्यात घेण्यात आले आहे. तरुणाने कुत्र्याला फासावर लटकावून त्याला जिवे मारले.

विमानातून ४ पक्ष्यांना आणणारे २ भारतीय प्रवासी अटकेत !

बँकॉकहून मुंबईत आलेल्या विमानातून सीमाशुल्क विभागाने ४ हॉर्नबिल, म्हणजेच धनेश पक्षी कह्यात घेतले आहेत. या प्रकरणी २ भारतीय प्रवाशांना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली आहे.

टपाली मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सिद्ध !

येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय कर्तव्यावर असलेले अधिकारी आणि कर्मचारी, सैन्यदलातील अधिकारी, दिव्यांग, तसेच ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक यांना त्यांचा मतदानाचा हक्क बजवावा, यासाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सांगली येथे घरातून सोन्याचे दागिने पळवले

सांगली येथील जामवाडीमधील बंगल्यात घुसून दुसर्‍या मजल्यावरील कपाटात ठेवलेले ३ लाख ४० सहस्र रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्याने पळवले आहेत.

बसखाली सापडून तरुणीचा मृत्यू !

दुचाकी घसरल्यामुळे रस्त्यावर पडलेल्या युवतीच्या डोक्यावरून पी.एम्.पी. बसचे चाक गेले. यात तिचा जागीच मृत्यू झाला.

घुसखोरीच्या संदर्भात राजकीय पक्षांनी घोषणापत्रातून भूमिका व्यक्त करावी ! – सुरेश चव्हाणके, संपादक, ‘सुदर्शन’ टीव्ही

सर्वच राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये घुसखोरीच्या विरोधात रोखठोक भूमिका घेण्याची नोंद असावी. त्यासाठी जागृत मतदारांनी जनमताचा दबाव निर्माण करावा, असे आग्रही प्रतिपादन राष्ट्रीय प्रवक्ते आणि ‘सुदर्शन’ टीव्हीचे संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी केले.

अधिवक्ता दत्ता सणस ‘अखिल भारत हिंदु महासभे’चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष !

नवनियुक्तीनंतर अध्यक्षीय भाषणात अधिवक्ता सणस म्हणाले, ‘‘भारतातील सर्व हिंदुत्वनिष्ठ विचारांचे राजकीय पक्ष आणि संघटन यांनी पक्षभेद, मतभेद विसरून हिंदुत्वाच्या रक्षणाच्या लढ्यासाठी एकत्र यावे”.

मुंबईत ९ महिन्यांत ४८४ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त !

या प्रकरणात १ सहस्र १० जणांना अटक करण्यात आली आहे. या काळात अमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी ५ सहस्र ९० जणांना अटक करण्यात आली आहे.

जया शेट्टी हत्या प्रकरणी छोटा राजनला जामीन

या प्रकरणी झालेल्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती मिळाली आहे. या शिक्षेला राजन याने याविरोधात याचिका केल्याने त्याचा निकाल लागेपर्यंत या शिक्षेला स्थगिती राहील.