तिरुपती देवस्थानकडून श्री महालक्ष्मीदेवीसाठी १ लाख २८ सहस्र रुपयांचे महावस्त्र अर्पण !

तिरुपती देवस्थानकडून श्री महालक्ष्मीदेवीसाठी सोनेरी रंगाचे आणि गडद वीटकरी, लाल रंगाचे काठ असणारे १ लाख २८ सहस्र ७०० रुपयांचे महावस्त्र अर्पण करण्यात आले. हे महावस्त्र बी. शशीधर यांनी सपत्नीक येऊन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे सुपुर्द केले.

श्री तुळजाभवानीदेवीची गरुड वाहनातून छबिना मिरवणूक !

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीदेवीची सकाळी ६ ते १० या वेळेत अभिषेक पूजा करण्यात आली. त्यानंतर आरती झाली. पारंपरिक पद्धतीने श्री तुळजाभवानीदेवीचे विविध धार्मिक विधी विधीवत् पूर्ण करण्यात आले.

चित्पावन संघाच्या वतीने शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त १० ऑक्टोबरला श्री महालक्ष्मी अष्टमी जागर सोहळा !

हा सोहळा १० ऑक्टोबरला सकाळी ९ ते रात्री १० या कालावधीत बिनखांबी गणेश मंदिराजवळ ब्राह्मण सभा करवीर येथे होणार आहे. या सोहळ्यात महापूजा, श्रींची कहाणी वाचन, आरती, महानैवेद्य, श्री देवीमूर्ती प्रतिष्ठापना यांसह घागरी फुंकण्याचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ७.३० नंतर महालक्ष्मीचे दर्शन भाविकांसाठी खुले होणार आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष मकरंद करंदीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सातारा पोलिसांची अवैध फटाका विक्रेत्यांवर कारवाई !

शहरांमध्ये माची पेठेत स्फोट झाल्यानंतर सातारा पोलीसदल सक्रीय झाले आहे. शाहूपुरी पोलिसांनी ४ ऑक्टोबर या दिवशी शहरातील अवैध फटाका विक्रेत्यांवर कारवाई केली, तसेच संबंधितांचे दुकानही ‘सील’ करत गुन्हा नोंद केला आहे.

‘हॉटेल शिदोरी’च्या माध्यमातून डोंबिवलीत पहिला ‘ओम प्रमाणित’ व्यवसाय चालू !

हिंदूंचे अस्तित्व आणि व्यवसाय यांच्या वृद्धीसाठी ‘ओम शुद्धता मानक प्रमाणपत्र’ देण्यात येते. डोंबिवलीतील पहिला आणि ठाणे जिल्ह्यातील दुसरा ‘ओम प्रमाणित’ व्यवसाय ‘हॉटेल शिदोरी’च्या माध्यमातून चालवला जात आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

अशांना कठोर शिक्षाच व्हायला हवी ! पालकांनीही त्यांच्या मुली कुणाशी मैत्री करत आहेत, याकडे लक्ष ठेवायला हवे !

मराठी भाषेला अभिजात दर्जा हा सर्वांसाठी सुवर्णक्षण ! – पंतप्रधान

पंतप्रधानांचे आभार मानण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने ‘अभिजात मराठी सन्मान सोहळ्या’चे आयोजन !