पोप ‘हमास’च्या अत्याचारांवर मौन बाळगत असल्याचे इस्रायलचे प्रत्युत्तर !
व्हॅटिकन सिटी – गाझावर इस्रायलने सतत बाँबफेक करणे, ही क्रूरता आहे, अशी टीका ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी केल्यावर इस्रायलने प्रत्युत्तर दिले आहे. इस्रायलने पोप फ्रान्सिस यांच्यावर दुटप्पीपणाचा आरोप केला. ‘जेरुसलेमच्या कॅथोलिक बिशपने २० डिसेंबर या दिवशी कॅथोलिकांना भेटण्यासाठी गाझा पट्टीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता; परंतु त्यांना प्रवेश नाकारण्यात आला’, असे पोप फ्रान्सिस यांनी भाषणात सांगितले.
इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, पोप यांची टीका निराशाजनक आहे; कारण हे युद्ध इस्रायलवर लादले गेले आहे. जेव्हा आतंकवादी मुलांच्या मागे लपून बसतात आणि इस्रायली मुलांना मारतात, तेव्हा क्रूरता असते. १०० जण, ज्यांत एक अर्भक आणि मुलगा यांचा समावेश आहे, त्यांना ४४२ दिवसांसाठी ओलीस ठेवणे, त्यांच्याशी गैरवर्तन करणे, ही क्रूरता होय. पोप यांनी या सगळ्याकडे दुर्लक्ष केले आहे. ‘लोकांना विनाकारण मारायचे नाही’, असे इस्रायलचे धोरण आहे; मात्र हमास गाझामधील लोकांचा ढाल म्हणून वापर करून आमच्यावर आक्रमण करत आहे. त्यामुळे इस्रायलला सतत प्रत्युत्तर द्यावे लागते.
संपादकीय भूमिकाप्रेम आणि शांती यांचा संदेश देणारे पोप कधी जगभरात थैमान घातलेल्या इस्लामी आतंकवादाविषयी बोलत नाहीत, हे लक्षात घ्या ! |