कोकणात अतीवृष्टीमुळे हानी झालेल्या शेतकर्‍यांना आर्थिक साहाय्य करा ! – सुरेश प्रभु, माजी केंद्रीय मंत्री

कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. शेतकर्‍यांचा मुख्य आर्थिक स्रोत त्यावरच अवलंबून आहे. भात पीक सिद्ध झालेले असतांना कापणीच्या हंगामात सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत पडलेल्या पावसामुळे शेती पूर्णत: भूईसपाट झाली आहे.

विरोधकांसाठी लाडक्या बहिणीच पुरेशा ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

विरोधकांविषयी बोलायची आवश्यकता नाही. मी त्याविषयी बोलणार नाही. त्यांच्यासाठी केवळ आमच्या लाडक्या बहिणी पुरेशा आहेत, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःचे उमेदवारी आवेदन प्रविष्ट केले.

अकलूज (सोलापूर) येथे गोवंशीय जनावरांचे ५५ किलो मांस आणि १९ जर्सी गोवंशीय जनावरे जप्त !

अकलूज येथील होनमाने प्लॉट येथे जनावरांची कत्तल झालेली आहे, अशी बातमी २२ ऑक्टोबर या दिवशी गोरक्षकांना मिळाली. तेथे गेले असता त्यांना ४-५ जण सौदागर कुरेशी यांच्या बंद घराजवळ उघड्यावर जर्सी जनावरे कापत होते.

निवडणुकीत अवैध पैशांचा वापर

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणात अवैधपणे पैसा वाटले जात आहेत. मागील २४ घंट्यांमध्ये राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध यंत्रणांनी पैसे, मद्य, अमली पदार्थ, मौल्यवान धातू आदी ५२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

मंदिरांवरील आघातांच्या विरोधात दबावगट निर्माण करण्याचा निर्धार !

मंदिरांवर होणार्‍या आघातांच्या विरोधात कुणीही ठामपणे कृती करतांना दिसत नाही. मंदिरांची भूमी बळकावणे, तसेच विविध आघात यांच्या विरोधात लढण्यासाठी हिंदूंचा दबावगट निर्माण करण्याचा निर्धार महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या बैठकीत करण्यात आला.

किशोरगंज (बांगलादेश) : धर्मांध मुसलमानांनी केली कालीमातेच्या मूर्तीची तोडफोड !

हिंदूंसाठी नरकासमान बनत चाललेला इस्लामी बांगलादेश !

‘चक दे इंडिया !’ या हिंदी चित्रपटात मूळ हिंदु प्रशिक्षकाऐवजी निर्मात्‍याने जाणीवपूर्वक मुसलमान प्रशिक्षक दाखवला !  

हिंदूंना हीन लेखून मुसलमानांना चांगले दाखवण्‍याचा मोहनदास गांधी यांच्‍यापासून चालू झालेला प्रवास अद्यापही थांबलेला नाही. या गोष्‍टी थांबवण्‍यासाठी आणि सत्‍य जगासमोर येण्‍यासाठी हिंदु राष्‍ट्राला पर्याय नाही !

Justin Trudeau : ट्रुडो यांचा पंतप्रधानपद सोडण्यास नकार !

खलिस्तानी आतंकवाद्यांना पोसणारे ट्रुडो यांचे राजकीय अस्तित्व कॅनडातील जनतेने पुढील वर्षीच्या निवडणुकीत संपवल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

Pujya (Advocate) Ravindra Ghosh Appeals : जगाने बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी आवाज उठवावा !

आम्ही वेळोवेळी बांगलादेशातील सरकारांना अल्पसंख्यांक हिंदूंचे रक्षण करण्याचे आवाहन केले, मात्र त्याचा काहीच लाभ झाला नाही. हे रोखले नाही, तर बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदूंचा वंशविच्छेद होईल !

१०१ दोषींना जन्मठेपेची शिक्षा : कोप्पल जिल्हा न्यायालयाचा निर्णय !

कोप्पल जिल्हा न्यायालयाने नुकतीच एकाच वेळी १०१ दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ही सामूहिक शिक्षा देशातील कोणत्याही जातीसंबंधित प्रकरणातील सर्वोच्च शिक्षा आहे.