बाणावली येथे समुद्रात मासेमार पेले यांना सापडले भगवान श्रीविष्णूच्या १० अवतारांच्या मूर्तींचे शिल्प

बाणावली येथील पारंपरिक मासेमार तथा पारंपरिक मासेमार संघटनेने अध्यक्ष पेले यांना समुद्रात आलेल्या वादळाच्या वेळी भगवान श्रीविष्णूच्या १० अवतारांचे चंदनाच्या लाकडावरील कोरीव शिल्प सापडले.

सुहासिनी जोशी यांना ‘विष्णुदास भावे गौरवपदक’ पुरस्कार घोाषित !

अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी या पुरस्काराची घोषणा केली. मराठी रंगभूमीदिनी ५ नोव्हेंबर या दिवशी अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.

सांगली येथे ‘नवदुर्गा सन्मान’ सोहळा उत्साहात पार पडला !

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर संघचालक डॉ. प्रियदर्शन चितळे यांनी भूषवले, तर प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध समुपदेशक सौ. अर्चना मुळे उपस्थित होत्या. या वेळी प्रमुख वक्त्या म्हणून लेखिका सौ. विनिता तेलंग यांनी मार्गदर्शन केले.

थोडक्यात महत्त्वाचे

नाशिक येथील तोफखाना केंद्रात (आर्टिलरी सेंटरमध्ये) स्फोट झाल्याने २ अग्नीविरांचा मृत्यू झाला. सरावाच्या वेळी गोळीबार करतांना स्फोट झाला. गोहिल सिंग आणि सैफतत शीत असे अग्नीविरांची नावे आहेत.

गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा !

महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांना राज्यशासनाने राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला आहे. ते पदावर कार्यरत राहिपर्यंत त्यांना हा दर्जा असेल. गायींचे रक्षण आणि संवर्धन यांसाठी राज्यशासनाने वर्ष २०२३ मध्ये ‘महाराष्ट्र गोसेवा आयोगा’ची स्थापना केली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मस्थानी ‘थीम पार्क’ उभारण्यासाठी १५ कोटी निधी संमत !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नाशिकमधील भगूर येथील जन्मस्थानी त्यांच्या जीवनावर आधारित ‘थीम पार्क’ उभारण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. त्यासाठी पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाकडून १५ कोटी रुपये इतका निधी संमत करण्यात आला आहे.

तमिळनाडूत झाड तोडतांना सापडले १ सहस्र वर्ष जुने शिवलिंग

कडलूरु जिल्ह्यातील चोळाधरम गावात १ सहस्र वर्ष जुने असणारे शिवलिंग सापडले आहे. झाडे तोडत असतांना दोन मोठ्या झाडांच्या मधोमध मातीत गाडलेले शिवलिंग आढळले आहे.

देहू आणि आळंदी पालखी मार्गांवर विठ्ठलमहिमा दर्शवणारे चित्ररथ साकारले जाणार !

आषाढी वारीनिमित्त जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे जन्मगाव देहू आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचे जन्मगाव आळंदी येथून या थोर संतांच्या नावांच्या दिंड्यांचे आयोजन करण्यात येते. या मार्गावर श्री विठ्ठलाचा महिमा दर्शवणारे चित्ररथ साकारण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे.

राज्यात राबवला जाणार ‘घर घर संविधान’ कार्यक्रम !

‘घर घर संविधान’ कार्यक्रमा अंतर्गत शाळेच्या प्रार्थनेमध्ये नियमित राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन करणे, शाळांना राज्यघटनेच्या प्रती देणे, राज्यघटनेच्या मूल्यांवर आधारित पथनाट्य सिद्ध करणे, विविध स्पर्धा घेणे आदी उपक्रम राबवले जाणार आहेत.