दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : पूर्व विदर्भात ठाकरे गटाला एकही जागा नाही ! ; बोरीवली पूर्व येथे शिवसेना आणि ठाकरे गट यांत बाचाबाची …

पूर्व विदर्भात ठाकरे गटाला केवळ एकच रामटेकची जागा मिळाली आहे. त्यामुळे नाना पटोले यांनी मोठी खेळी खेळल्याची चर्चा आहे. गोंदियामध्ये एकही जागा मिळालेली नाही.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आत्मचरित्रात मुंबई पोलिसांच्या हप्ते वसुलीची स्वीकृती !

या आत्मकथेमध्ये त्यांनी स्वत: गृहमंत्री असतांना तत्कालीन साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे मुंबईतील बार-हुक्का मालकांकडून हप्ते वसूल करत असल्याचे मान्य केले आहे

गांजा बाळगल्याप्रकरणी पुणे येथे धर्मांधाला अटक !

‘गुन्हे शाखा पथक ६’ने कारवाई करत चांद कासम पठाण याला ३०० ग्रॅम गांजा विक्रीसाठी बाळगल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

सकल हिंदु समाजाच्या मागण्यांचा घोषणापत्रात समावेश करण्याविषयी प्रयत्नशील ! – धनंजय महाडिक, खासदार, भाजप

श्री. धनंजय महाडिक पुढे म्हणाले, ‘‘या समितीकडे लाखोंच्या संख्येने सूचना आमच्याकडे आल्या आहेत. येत्या ३-४ दिवसांत या समितीची बैठक होऊन याला अंतिम स्वरूप प्राप्त होईल.

भाजपचे नेते शिवाजी डोंगरे यांचे अपक्ष म्हणून उमेदवारी आवेदन प्रविष्ट !

या मतदारसंघातून विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे; मात्र त्यांच्या उमेदवारीला शिवाजी डोंगरे यांनी विरोध दर्शवला आहे. पक्षाशिवाय निवडणूक लढणार, असा निश्चय त्यांनी माधवनगर येथे झालेल्या बैठकीत केला होता.  

संगमनेरमधील तोडफोड प्रकरणी जयश्री थोरात, खासदार वाकचौरे यांसह ५० जणांवर गुन्हा नोंद !

संगमनेरमधील वादग्रस्त प्रकरणात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे यांसह ५० जणांवर गुन्हा नोंद झाला आहे.

मिरज येथे एकाकडून सव्वा किलो गांजा जप्त !

अमली पदार्थांच्या विक्रेत्यांसाठी उद्यान बनलेले महाराष्ट्र राज्य !

पुणे येथे १ कोटी रुपयांचा गुटखा पकडला !

गुटखा उत्पादन करणारे, विकणारे आणि त्याचे सेवन करणारे यांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित !

सकल हिंदु समाजाच्या वतीने पुणे आणि सातारा येथे संत-महंत आणि सहस्रो धर्मप्रेमींच्या उपस्थितीत संत संमेलन पार पडले !

स.प. महाविद्यालय, टिळक रस्ता, पुणे येथे झालेल्या या कार्यक्रमात ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास, अयोध्या’चे कोषाध्यक्ष प.पू स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी मार्गदर्शन केले.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून तिसर्‍या टप्प्यात २५ उमेदवारांची घोषणा !

विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने २५ उमेदवारांची तिसरी सूची प्रसिद्ध केली आहे. पहिल्या सूचीत ९९, दुसर्‍या सूचीत २२, तर तिसर्‍या सूचीतील २५ मिळून आतापर्यंत भाजपने एकूण १४६ उमेदवार घोषित केले आहेत