विक्रोळीतील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करणारा मुख्याध्यापक अटकेत !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – विक्रोळीतील एका नामवंत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केले. या प्रकारामुळे ती घाबरून शाळेत जाण्यास टाळाटाळ करत होती. पालकांनी तिला विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली असता तिने वरील प्रकार सांगितला. मुख्याध्यापक वारंवार तिला त्यांच्या कार्यालयात बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचे. या प्रकरणी मुख्याध्यापकांना अटक करण्यात आली आहे. पालकांच्या तक्रारीनंतर त्यांच्या विरोधात ‘पॉक्सो’अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका :

मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि शिपाई सगळेच वासनांध होऊ लागले, तर भविष्यात विद्यार्थिनींना शाळेत पाठवणेच कठीण होईल ! यासाठी अशा वासनांधांना कठोर शिक्षाच व्हायला हवी !