ठेवीस्वरूपात गुंतवणुकीत ३० टक्के वाढ !
शिर्डी – गेल्या वर्षभरात ३ कोटींहून अधिक भाविकांनी साईबाबांचे दर्शन घेतले. साईंच्या देणगीत ४५१ कोटी रुपयांहून अधिक दान केले. संस्थानला वर्षभरात ८१९ कोटी ५७ लाख रुपयांचे उत्पन्न झाले. गेल्या वर्षाच्या तुलनेत १५ कोटी ६४ लाख रुपयांनी उत्पन्न वाढले आहे. साईबाबा संस्थानला मिळणार्या विशेष देणग्यांमध्ये ३८.६० टक्के आणि इतर प्रकारच्या देणग्यांमध्ये १८.७२ टक्के वाढ झाली आहे. वर्ष २०१९-२० मध्ये साईबाबा संस्थानला वार्षिक विशेष देणगी म्हणून १०२ कोटी ९३ लाख रुपये मिळत होते. गेल्या ५ वर्षांत साईबाबा संस्थानला मिळणार्या एकूण देणग्यांमध्ये २४.३६ टक्के वाढ झाली आहे.
संस्थानला गेल्या ५ वर्षांत एकूण १६०३ कोटी ७७ लाख रुपयांची देणगी मिळाली. विधान परिषदेत साईबाबा संस्थानचा वर्ष २०२३-२४ चा वार्षिक अहवाल सादर झाला. त्यातून ही माहिती समोर आली.