दैनिक ‘सनातन प्रभात’ने चित्रपट, नाटके, विज्ञापने आदींमधील श्रद्धास्थानांच्या अवमानाविषयी हिंदूंना जागृत केले !
सद्यःस्थितीत हिंदू जागृत होत आहेत. अनेक ठिकाणी देवता, संत आणि अन्य श्रद्धास्थानांच्या अवमानाविरोधात हिंदू कायदेशीर लढा देत आहेत. सामाजिक माध्यमांवर वैचारिक प्रतिवाद करायला लागले आहेत. हिंदूंमधील हा धर्माभिमान, म्हणजे एक प्रकारे ‘सनातन प्रभात’च्या वैचारिक लढ्याचा विजय होय.