राजकोट (सिंधुदुर्ग) येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या प्रकरणी तिसर्‍या संशयित आरोपीला पोलीस कोठडी

शहरातील राजकोटवर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याच्या प्रकरणातील तिसरा संशयित आरोपी परमेश्वर यादव (रहाणार मिर्जापूर, उत्तरप्रदेश) याला येथील न्यायालयाने १९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

उपअभियंता नितीन तारमाळे यांचे हृदयविकाराने निधन

नवी मुंबई महापालिकेचे उपअभियंता नितीन तारमाळे यांचे १८ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी वाशीतील फोर्टिस रुग्णालयात उपचाराच्या वेळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते तुर्भे विभागातील पाणीपुरवठा विभागात कार्यरत होते.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घरांवरील, चौकांमधील भगवे ध्वज काढण्यात येऊ नयेत !

‘विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४’च्या पार्श्वभूमीवर घरांवरील, जागोजागी असलेल्या चौकांमध्ये लावण्यात आलेले भगवे ध्वज काढण्यात येऊ नयेत, या मागणीचे निवेदन हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी देण्यात आले.

श्री तुळजाभवानीदेवीच्या नवरात्रोत्सवाची सांगता !

१७ ऑक्टोबर म्हणजे आश्विन पौर्णिमेला रात्री छबिना मिरवणूक पार पडली. यानंतर महंत तुकोजीबुवा यांनी जोगवा मागितला आणि त्यानंतर १५ दिवस चालू असलेल्या श्री तुळजाभवानीदेवीच्या नवरात्रोत्सवाची सांगता झाली.

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांना अटक आणि जामिनावर सुटका !

धनादेश न वटल्याच्या प्रकरणात ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांना अटक करण्यात आली. जामीन संमत होऊन त्यांची त्वरित सुटका झाली. ७ नोव्हेंबरला पुढील सुनावणी आहे.

पुणे शहरातील प्रमुख रस्ते स्वच्छ करण्यासाठीचा व्यय १०० कोटी रुपयांनी वाढला !

पुणे शहरातील प्रमुख रस्त्यांचे झाडणकाम यांत्रिकीकरणाद्वारे करण्यासाठी महापालिकेने ५ वर्षांसाठी ६० कोटी रुपयांची निविदा काढली होती. त्या निविदेमध्ये अन्य तांत्रिक गोष्टींचा समावेश केल्यामुळे ठेकेदारांनी ३८ ते ८० टक्के अधिक दराने निविदा भरल्या होत्या.

विश्‍व हिंदु परिषदेचे कोकण प्रांत मंत्री श्री. मोहन सालेकर यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

विश्‍व हिंदु परिषदेचे कोकण प्रांत मंत्री श्री. मोहन सालेकर आणि गोवा विभाग मंत्री श्री. मोहन आमशेकर यांनी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.

दादर बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावर प्रतिदिन सकाळी फेकला जातो कचरा !

‘स्वच्छ मुंबई’ मोहिमेचे तीनतेरा ! महाराष्ट्राच्या राजधानीचे प्रतिदिन सकाळी दिसणारे हे भोंगळ रूप लाजिरवाणेच !

पहिला विवाह लपवून दुसरा विवाह करणार्‍या महिला पोलिसासह ३ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद !

पहिला विवाह लपवून दुसरा विवाह करत पतीची फसवणूक केल्याच्या प्रकरणी वंदना महेश कांबळे (वय ३९ वर्षे) या महिलेच्या विरोधात सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दिवाळीपूर्वी मंदिर स्वच्छता अभियान राबवून मंदिरावर भगवे ध्वज फडकावणार !

विहिंप यंदा महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांत किमान ५ सहस्र धार्मिक ठिकाणी ‘गाभारा ते अंगण स्वच्छता सेवा’ अभियान राबवणार आहे.