कर्नाटकने म्हादई नदीवरील धरणासाठी काढली निविदा !

कर्नाटक येथील खानापूरस्थित ‘कर्नाटक निरवरी निगम’ या शासकीय आस्थापनाने ही निविदा काढली आहे. एक वर्षात हे काम पूर्ण करण्याचा उल्लेख निविदेत करण्यात आला आहे.

गोव्यात वेश्याव्यवसाय आणि दलाल यांची प्रतिदिन २ कोटी रुपयांची उलाढाल !

अनैतिक व्यवसायांच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल ? पोलीस आणि प्रशासन काय करत आहेत ? राज्यात चालणारे असे अनैतिक व्यवहार कायमचे बंद होण्यासाठी आता जनतेनेच जागृत आणि सतर्क रहाण्याची वेळ आली आहे !

गोव्यात आक्रमक कुत्र्यांच्या जातींवर बंदी आणण्याचा विचार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे वक्तव्य

याचसमवेत सर्वत्र फोफावलेली भटक्या कुत्र्यांची समस्याही सरकारने गांभीर्याने आणि त्वरित सोडवणे अपेक्षित आहे !

कावेरी नदीचा गुंता !

सद्यःस्‍थितीत प्रत्‍येक जण हा अधिकारच सांगत आहे आणि दुसर्‍यासाठी त्‍याग करण्‍यास सिद्ध नाही. त्‍यामुळे कावेरी प्रश्‍नासारखे अनेक प्रश्‍न सध्‍या चिघळत आहेत. यातून प्रशासकीय व्‍यवस्‍थेचे अपयश वारंवार अधोरेखित होते आणि सनातन धर्मराज्‍याची (हिंदु राष्‍ट्र) आवश्‍यकता याकडेच आपल्‍याला जावे लागते !

गोव्यात किशोरवयीन मुली गर्भवती होण्याचे वाढते प्रकार चिंताजनक ! 

धर्मशिक्षण आणि साधना यांअभावी समाजाची झालेली ही अधोगती आहे ! मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धत, अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली चाललेला स्वैराचार, लिव्ह इन रिलेशनशिपसारखी विकृती, अश्‍लील चलचित्रे, आदी गोष्टी यास कारणीभूत आहेत !

वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) शहरात भटक्या कुत्र्यांच्या आक्रमणात लहान मुलगा गंभीररित्या घायाळ

कुत्र्यांची समस्याही सोडवू न शकणारे प्रशासन राज्याचा कारभार कसा हाकत असेल ?, हेच यावरून लक्षात येते ! यास उत्तरदायी असणार्‍यांना सरकारने तात्काळ सेवामुक्त केले पाहिजे !

बांगलादेशी घुसखोरी – राष्‍ट्रासाठी घातक !

देशाचे स्‍वातंत्र्य अबाधित रहावे; म्‍हणून आपल्‍या वीर सैनिकांनी हौतात्‍म्‍य स्‍वीकारले. अनेक जण जायबंदी झाले. तथापि शासनकर्त्‍यांनी मात्र देशभक्‍तांचा त्‍याग, शौर्य, बलीदान यांचा अपमान करून स्‍वतःची राजकीय सत्ता टिकून राहण्‍यासाठी घुसखोरांना अभय दिले आहे !

मराठा समाजाला ओ.बी.सी. संवर्गात समाविष्ट करू नये !

मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळावे, ही मराठा समाजाची मागणी असतांना त्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओ.बी.सी. प्रवर्गात घुसवण्याचा सरकारचा विचार आहे. तसे झाले, तर पुढे होणार्‍या परिणामांना सरकार उत्तरदायी राहील – ओ.बी.सी. संघटना, सिंधदुर्ग

‘वेश्या’ हा व्यवसाय नसून स्त्रियांना नाडणारी संघटित गुन्हेगारी ! – अरुण पांडे, ‘अर्ज’ संस्था

डॉ. रूपेश पाटकर यांच्या ‘अर्जमधील दिवस’ या वेश्या वस्तीतील प्रत्यक्ष कामाविषयीच्या अनुभवांवरील पुस्तकाला या वर्षीचा ‘सरस्वती लक्ष्मण पवार पुरस्कार’ घोषित झाला. या पुरस्काराचे वितरण सावंतवाडी शहरातील श्रीराम वाचन मंदिरात झाले.

राज्यात कौटुंबिक न्यायालय स्थापन करा ! – आमदार उल्हास तुयेकर, भाजप, गोवा

घटस्फोट होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत; मात्र जोडीदारांच्या अहंकारामुळे प्रश्न सुटत नाहीत. यामुळे कुटुंबातील सदस्यांना अनेक अडचणी येत आहेत. ही प्रकरणे अनेक वर्षे प्रलंबित रहातात.