GOA OCI Card Issue : ‘ओ.सी.आय्.’ कार्डसाठी आता भारतीय पारपत्र समर्पण केल्याचे प्रमाणपत्र पुरेसे
‘ओ.सी.आय्.’ कार्ड मिळवण्यासाठी आता पर्यायी कागदपत्र म्हणून पारपत्र समर्पण केल्याचे प्रमाणपत्र पुरेसे असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. याचा सहस्रो गोमंतकीय आणि त्यांचे कुटुंबीय यांना लाभ मिळणार आहे.