गोव्यात ७८ टक्के वेश्याव्यवसाय हॉटेल आणि ‘लॉज’ यांमधून चालतो !

पणजी, ५ ऑक्टोबर (वार्ता.) : गोव्यात ७८ टक्के वेश्याव्यवसाय हॉटेल आणि ‘लॉज’ यांमधून चालतो; मात्र अशा हॉटेल आणि लॉज यांवर कोणतीच कारवाई करण्यात येत नाही. अनैतिक मानवी तस्करी करणारे दलाल महिलांकडून उघडपणे वेश्याव्यवसाय करून घेतात. या व्यवसायासाठी हॉटेल व्यावसायिकांचाही वापर केला जातो. (राज्यात पोलीस आणि प्रशासन असतांना उघडपणे तस्करी, वेश्याव्यवसाय चालणे लज्जास्पद ! – संपादक) ही माहिती वेश्याव्यवसायाशी निगडित युवतींचे पुनर्वसन करणार्‍या ‘अर्ज’ या संस्थेने सिद्ध केलेल्या अहवालात दिली आहे. पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या कारवाईच्या आधारावर ‘अर्ज’ या संस्थेने हा अहवाल सिद्ध केला आहे. ‘अर्ज’ संस्थेचे प्रमुख अरुण पांडे यांनी संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने ‘गोवा श्रमिक पत्रकार संघटने’च्या विद्यमाने आयोजित कार्यशाळेत ही माहिती दिली.

(सौजन्य : THE TRUE GOA NEWS) 

या अहवालानुसार, ७८ टक्के वेश्याव्यवसाय हॉटेल आणि लॉज यांवर, १२ टक्के ‘मसाज पार्लर’मध्ये आणि १० टक्के निवासी सदनिका यांमधून चालतो. वेश्या व्यवसायासाठी देशातील विविध राज्यांसह विदेशातूनही महिला आणल्या जातात. गोव्यात वेश्या व्यवसायासाठी बांगलादेशातून ४२ टक्के, नेपाळमधून २५ टक्के आणि उझबेकिस्तानमधून १६ टक्के महिला आणल्या जातात. तसेच रशिया, थायलंड आणि तुर्कीचे येथूनही महिला आणल्या जातात. (या अहवालातील माहितीकडे गांभीर्याने लक्ष देऊन सरकारने तत्परतेने कठोर पावले उचलणे आवश्यक ! – संपादक)

एका सामाजिक कार्यकर्तीने ‘राज्यात ‘रेडलाईट’ क्षेत्र असल्यास महिला आणि तरुणी सुरक्षित रहातात. ‘रेडलाईट’ क्षेत्र ही समाजाची ढाल आहे’,असा युक्तीवाद नुकताच केला होता. हा युक्तीवाद समाजासाठी किती घातक आहे ? याविषयी डॉ. रूपेश पाटकर यांनी सोदाहरण माहिती दिली.

(चित्रावर क्लिक करा)

सविस्तर वृत्त वाचा –

गोव्यात वेश्याव्यवसाय आणि दलाल यांची प्रतिदिन २ कोटी रुपयांची उलाढाल !
https://sanatanprabhat.org/marathi/725356.html

संपादकीय भूमिका

गोव्यातील हॉटेल्सचा वेश्या व्यवसायासाठी होत असलेला वापर चिंताजनक असून त्यांची सातत्याने पडताळणी होणे आवश्यक !