‘स्टॅलिन’रूपी संकट !

‘तमिळनाडूवर अण्णाद्रमुकने राज्य करावे कि द्रमुकने ?’ असा प्रश्न निरर्थक आहे; कारण या राज्यात राष्ट्रवाद किंवा हिंदुत्व या सूत्रांना काहीच किंमत दिली जात नाही. तमिळनाडूमध्ये आतापर्यंतच्या राजकारण्यांनी ‘आमची वेगळी तमिळी संस्कृती’, असे जनतेच्या मनावर बिंबवले.

वर्षाला ६ सिलिंडर विनामूल्य आणि कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्याचे आश्‍वासन !

जनतेला लाच देऊन सत्ता मिळवणारे राजकीय पक्ष स्वतःच्या खिशातील नाही, तर जनतेचेच पैसे उधळत आहेत, हे लक्षात घ्या !

तमिळनाडूतील इस्लामी संघटनांची मारवाडी समाजाला तमिळनाडू सोडून जाण्याची धमकी

हिंदूंमधील एकेका समाजाला लक्ष्य करण्याचा धर्मांधांचा हा नवीन कट आहे ! त्यामुळे हिंदूंनी संघटित होऊन याचा विरोध केला पाहिजे आणि अशा संघटनांवर कारवाई करण्यास राज्य आणि केंद्र सरकारला भाग पाडले पाहिजे !

केजरीवाल शासन देहली येथे कोकणी अकादमी स्थापन करणार

भारतातील विद्यार्थ्यांना भाषेसंबंधी ज्ञान मिळवण्यास प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने येथील केजरीवाल शासनाने देहलीमध्ये कोकणी अकादमी चालू करण्याचा प्रस्ताव संमत केला आहे. देहली मंत्रीमंडळाने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

चेन्नई येथे मंदिरासाठीची आरक्षित भूमी महापालिकेने सभागृह बांधण्यासाठी कह्यात घेतल्याच्या विरोधात भारत हिंदू मुन्नानीचे आंदोलन

हिंदूंना भारतात कुणीच वाली नसल्याने अशा घटना सरकारी यंत्रणांकडून होत आहेत. ही स्थिती रोखण्यासाठीच हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !