मराठा समाजाला ओ.बी.सी. संवर्गात समाविष्ट करू नये !

मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळावे, ही मराठा समाजाची मागणी असतांना त्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओ.बी.सी. प्रवर्गात घुसवण्याचा सरकारचा विचार आहे. तसे झाले, तर पुढे होणार्‍या परिणामांना सरकार उत्तरदायी राहील – ओ.बी.सी. संघटना, सिंधदुर्ग

‘वेश्या’ हा व्यवसाय नसून स्त्रियांना नाडणारी संघटित गुन्हेगारी ! – अरुण पांडे, ‘अर्ज’ संस्था

डॉ. रूपेश पाटकर यांच्या ‘अर्जमधील दिवस’ या वेश्या वस्तीतील प्रत्यक्ष कामाविषयीच्या अनुभवांवरील पुस्तकाला या वर्षीचा ‘सरस्वती लक्ष्मण पवार पुरस्कार’ घोषित झाला. या पुरस्काराचे वितरण सावंतवाडी शहरातील श्रीराम वाचन मंदिरात झाले.

राज्यात कौटुंबिक न्यायालय स्थापन करा ! – आमदार उल्हास तुयेकर, भाजप, गोवा

घटस्फोट होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत; मात्र जोडीदारांच्या अहंकारामुळे प्रश्न सुटत नाहीत. यामुळे कुटुंबातील सदस्यांना अनेक अडचणी येत आहेत. ही प्रकरणे अनेक वर्षे प्रलंबित रहातात.

म्हादई अभयारण्य व्याघ्रक्षेत्र घोषित झाल्यास केवळ सहा कुटुंबांचेच पुनर्वसन करावे लागेल ! – राजेंद्र केरकर, पर्यावरणतज्ञ

म्हादई अभयारण्य आणि इतर परिसर व्याघ्रक्षेत्र घोषित झाल्यास सुमारे १५ सहस्र कुटुंबांवर त्याचा परिणाम होणार असल्याचा दावा पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी नुकताच केला होता. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलतांना पर्यावरणतज्ञ राजेंद्र केरकर यांनी ही माहिती दिली.

सहमतीने शारीरिक संबंध ठेवण्याचे वय १६ वर्षे करावे !

लहानपणापासूनच मुला-मुलींना साधना शिकवल्यास त्यांची बुद्धी सात्त्विक बनून ते अयोग्य गोष्टी करणार नाहीत ! सरकारने यासाठी प्रयत्न केले पाहिजे !

गोवा : कळंगुट येथील बालग्रामसभेत विद्यार्थ्यांनी सार्वजनिक ठिकाणी होणार्‍या मद्यपानाच्या घटनांकडे लक्ष वेधले

जे विद्यार्थ्यांच्या लक्षात येते ते पंचायतीला का लक्षात येत नाही ? पुढील सभेपर्यंत तरी शाळांनी आणि पंचायतीने विद्यार्थ्यांनी मांडलेल्या समस्या सोडवाव्यात !

गोवा : मुरगाव पालिकेचे प्रतिदिन २० कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचे ध्येय

‘कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणे योग्य आहे; मात्र सध्या भटकी कुत्री नागरिकांचे चावे घेत आहेत. त्यावर उपाययोजना काय आहे ?

तीन राज्यांचा समलिंगी विवाहाला विरोध ! – केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. संजय किशन कौल, न्या. एस्.आर्. भट, न्या. हिमा कोहली आणि न्या. पी.एस्. नरसिंह यांच्या घटनापिठासमोर या खटल्याची सुनावणी चालू आहे.

कोयना धरणातून सोडले कर्नाटकला पिण्‍यासाठी पाणी !

कर्नाटक राज्‍याने पिण्‍यासाठी पाणी मागितल्‍याने कोयना धरणातून २ मे या दिवशी अतिरिक्‍त पाणी पूर्वेकडे नदीपात्रात सोडण्‍यात आले.

अतिक अहमद आणि अश्रफ अहमद यांची हत्या

पत्रकाराच्या रूपात तेथे आलेल्या ३ जणांनी पाठीमागून येऊन कुख्यात गुंड अतिक अहमद आणि त्याचा गुंड भाऊ अश्रफ अहमद यांची डोक्यात गोळ्या झाडून हत्या केली. तिघांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करल्यावर त्यांना अटक करण्यात आली.