धारगळ, पेडणे येथे २८ ते ३० डिसेंबर या कालावधीत होणार ‘सनबर्न’ महोत्सव
धारगळ, पेडणे येथे २८ ते ३० डिसेंबर २०२४ या कालावधीत ‘सनबर्न इलेक्ट्रॉनिक म्युझिक फेस्टिव्हल’च्या आयोजनासाठी पर्यटन खात्याने १२ डिसेंबर या दिवशी तत्त्वत: मान्यता दिली आहे. ‘सनबर्न’चे आयोजक ‘स्पेसबाऊंड वेब लॅब प्रा.लि.’ यांना ही मान्यता देण्यात आली आहे.