बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी रेल्वेगाडीवरील आक्रमण, म्हणजे हिंसाचार अधिक वाढण्याची शक्यता !
‘पाकिस्तानाच्या अशांत प्रांत बलुचिस्तानमध्ये ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’च्या स्वातंत्र्य सैनिकांनी एका रेल्वेगाडीवर आक्रमण केले आणि त्यात असलेल्या ३० पाकिस्तानी सैनिकांना ठार मारले. त्यानंतर त्यांनी या गाडीतील प्रवाशांना बंधक बनवले.