भक्तीयोग जाणून घेतांना…
‘ब्रह्मज्ञान जाणून घेण्यास अत्यंत कठीण आहे. त्यासाठी विशिष्ट प्रकारची मानसिक, बौद्धिक क्षमता असावी लागते. सर्वसामान्य लोकांना ब्रह्मज्ञान सहजासहजी जाणून घेता येत नाही’, हे लक्षात घेऊन गीतेने ‘भक्तीयोगा’चे माहात्म्य सांगून सर्वसामान्य मानवी समाजाला मोठा दिलासा दिला आहे.