अहिल्यानगर येथील हरिश्चंद्र गडावरील शिवपिंडीला तडे; पुरातत्व विभागाचे संवर्धनाकडे दुर्लक्ष !

पिंडीला तडे जाऊनही पुरातत्व विभाग मंदिराकडे का दुर्लक्ष करत आहे ? पुरातत्व विभागाचे नेमके काय काम ?

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या प्राचीन दागिन्यांच्या मूल्यांकनासाठी लेखापरीक्षक मिळेना !

मंदिरांचा सर्व कारभार पहाणारे भक्त का हवेत ? हे यावरून लक्षात येते ! भक्तांना देवाची सेवा अचूक होण्याची जशी तळमळ असते, तशी तळमळ सरकारीकरण झालेल्या मंदिरांतील ‘पगारी कामगारां’मध्ये दिसून येत नाही, ही वस्तूस्थिती आहे ! त्यामुळे मंदिरे निस्वार्थी असलेल्या भक्तांच्याच स्वाधीन असली पाहिजेत !

आपले अनेक प्रश्न, अडचणी आपण श्रद्धेच्या बळावर सोडवू शकतो ! – श्री परब्रह्म ज्ञानभास्कर महादेव शिवाचार्य महाराज (वाई )

प्रत्येक मंदिरात सप्ताहातून किमान १ समष्टी आरती होणे आवश्यक आहे. त्यामुळे सामूहिक श्रद्धेला बळकटी मिळू शकते.

श्री तुळजाभवानी मंदिरात पारंपरिक वाद्यांना सुरक्षारक्षकांनी प्रवेश नाकारला !

सर्व प्रथा-परंपरा पाळतांना पारंपरिक वाद्ये वाजवली जातात. विधीसाठी भाविक वाजत-गाजत देवीच्या मंदिरात येतात. बंदी घातल्याने ही परंपरा मोडीत निघण्याची भीती आहे.

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीचे पुन्हा संवर्धन करण्यापूर्वी त्याचे दायित्व निश्‍चित करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी

आता जे संवर्धन होणार आहे, त्या संवर्धानामुळे मूर्तीची हानी झाली, तर त्याचे नेमके दायित्व निश्‍चित करणे आवश्यक आहे. हे दायित्व निश्‍चित होत नाही, तोपर्यंत संवर्धनास स्थगिती देण्यात यावी – महाराष्ट्र मंदिर महासंघ

अररिया (बिहार) येथे धर्मांधांकडून मंदिराची तोडफोड

भारतात आजही महंमद गझनी याचे वंशज कार्यरत असून त्यांना वठणीवर आणण्यासाठी सरकारने पावले उचलावीत !

Encroachment Of Goa Missionaries : शंखवाळ (सांकवाळ) येथील पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराची भूमी बळकावण्याचा चर्च संस्थेचा सुनियोजित प्रयत्न !

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर असलेल्या ठिकाणी (वारसा स्थळी) अतिक्रमण करण्याचे प्रकार ! वारसा स्थळी शव आणून प्रार्थना करण्याचा प्रकार पूर्णपणे निषेधार्ह ! हा प्रकार रोखण्याचे दायित्व सरकारचे नाही का ?

अमेरिकेतील मंदिरांची तोडफोड आणि हिंदूंवरील द्वेषपूर्ण गुन्हे यांची आकडेवारी द्या ! – भारतीय वंशाचे अमेरिकेतील खासदार

भारतात हिंदूंच्या मंदिरांवर आणि हिंदूंवरील द्वेषपूर्ण गुन्हे यांची माहिती देशातील किती लोकप्रतिनिधी सरकारकडे मागतात ? आणि संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करतात ?

चंपकधाम स्वामी देवस्थानच्या जत्रेत अन्य धर्मियांना व्यापार करण्यास अनुमती देऊ नये !

एप्रिल मासात या देवस्थानचा जत्रा महोत्सव होणार आहे. देवावर श्रद्धा नसणार्‍या अन्य समुदायाचे आणि नास्तिक लोक हे देवस्थानाच्या प्रांगणात, परिसरात मंदिराच्या पावित्र्याला धक्का पोचेल, अशा रितीने व्यापार करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काश्मीरमध्ये मार्तंड सूर्यमंदिर पुन्हा उभे रहाणे म्हणजे गुलामी मानसिकतेचे मळभ दूर होणे !

काश्मीरचा सम्राट ललितादित्य मुक्तपीड याने काश्मीरमध्ये मार्तंड सूर्यमंदिराची उभारणी केली होती. या मंदिराची भव्यता आणि सौंदर्य विलक्षण होते. मोढेरा, मुल्तान आणि कोणार्क येथील सूर्यमंदिरापेक्षाही मार्तंड सूर्यमंदिर भव्य होते.