नागोठणे (जिल्हा रायगड) येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा १७ जणांना चावा !

नागोठणे (जिल्हा रायगड) : येथे एका पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने एका दिवसात १७ जणांवर आक्रमण करून चावा घेतला. यात २ – ३ लहान मुलांचाही समावेश आहे. यामुळे नागरिक भयभीत आहेत. ग्रामपंचायतीने कुत्र्याला पकडण्याची शोधमोहीम हाती घेऊनही तो सापडलेला नाही. घायाळ झालेल्या सर्वांना रेबीज प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

एका कुत्र्याचा बंदोबस्त करू न शकणारे प्रशासन काय कामाचे ?