China PL-15 Missiles To Pakistan : भारतासमवेत होणार्‍या युद्धाच्या पार्श्वभूमीवर चीनने पाकला दिली १०० क्षेपणास्त्रे

इस्लामाबाद  (पाकिस्तान) – पहलगाम आतंकवादी आक्रमणानंतर भारत पाकला कल्पनेपेक्षाही मोठा धडा शिकवणार असल्यानंतर पाकनेही भारताला डोळे दाखवणे चालू केले आहे. पाकच्या वायूदलाने सामाजिक माध्यमांत एक छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. यामध्ये ‘जेएफ्-१७ सी’ या पाकच्या लढाऊ विमानावर ‘पीएल्-१५’ हे प्रगत क्षेपणास्त्र बसवलेले दिसत आहे. हे क्षेपणास्त्र चीनने दिलेले आहे. चीनने अशी १०० क्षेपणास्त्रे पाकला दिली आहे. हे छायाचित्र प्रसिद्ध करण्यामागे भारताला धमकावण्याचा पाकिस्तानचा हेतू असल्याचे मानले जाते.

भारतासमवेतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने ही क्षेपणास्त्रे पाकिस्तानला दिल्याचे वृत्त आहे. चीनचे पीएल्-१५ क्षेपणास्त्र हवेतून हवेत मारा करणारे लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता २०० ते ३०० किलोमीटर आहे.

संपादकीय भूमिका

चीनने पाकला कितीही क्षेपणास्त्रे दिली, तरी त्याचा वापर करण्याची क्षमता पाकमध्ये असली पाहिजे ! वर्ष १९६५ च्या युद्धात अमेरिकेने पाकला दिलेले ‘पॅटर्न’ हे आधुनिक रणगाडे भारताने उद्ध्वस्त केले होते, हे लक्षात ठेवले पाहिजे !