प्रेमळ, नम्र आणि संतांविषयी अपार भाव असलेले देहली येथील सनातनचे ११५ वे समष्टी संत पू. संजीव कुमार (वय ७१ वर्षे) !
सर्वसामान्यतः व्यावसायिक ‘धूर्त आणि इतरांना बोलण्यात गुंगवणारे’, असे असतात. पू. संजीव कुमार मोठे व्यावसायिक असूनही त्यांच्या बोलण्यात निर्मळता जाणवते. त्यांच्यातील विनम्रतेचा अनुभव त्यांच्या वागण्यातून प्रत्येक साधकाला येतो.