Temples In Pakistan NOW N THEN : पाकमध्ये फाळणीपूर्वी असणारी ४२८ हिंदु मंदिरे आता राहिली केवळ २२  !

नवी देहली : अनेक प्रसारमाध्यमांच्या वृत्तांनुसार भारताची फाळणी होण्यापूर्वी पाकिस्तानच्या भागात ४२८ हिंदू मंदिरे होती; परंतु फाळणी झाल्यानंतर १९९० च्या दशकापर्यंत ४०० हून अधिक मंदिरे रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, सरकारी शाळा किंवा मदरसे यांंमध्ये रूपांतरित झाली होती.

आता पाकिस्तानात केवळ २२ हिंदु मंदिरे उरली आहेत आणि त्यांपैकी सर्वाधिक ११ सिंध प्रदेशात आहेत, अशी पोस्ट ‘पांचजन्य’ या नियतकालिकाच्या खात्यावरून करण्यात आली आहे.