10 Pakistani Soldiers Killed : बलुचिस्तानच्या सशस्त्र स्वातंत्र्यसैनिकांकडून पाकचे १० सैनिक ठार

क्वेट्टा (पाकिस्तान) – येथे बलुच लिबरेशन आर्मीने केलेल्या आक्रमणात १० पाकिस्तानी सैनिक ठार झाले. या संघटनेने एक निवेदन प्रसारित करून या आक्रमणाचे दायित्व स्वीकारले आहे. या संघटनेने यात म्हटले आहे की, त्यांच्या स्वातंत्र्यसैनिकांनी ‘रिमोट कंट्रोल्ड’ बाँबद्वारे पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्याला लक्ष्य केले. हे आक्रमण आमच्या स्वातंत्र्यलढ्याचा एक भाग आहे.