Varanasi 250 Yr Old Temple Found : वाराणसीमध्ये मुसलमानबहुल भागात बंद असलेले २५० वर्षे जुने मंदिर सापडले !

मंदिर उघडण्यासाठी मुख्यमंत्र्यांना आवाहन !

मदनपुरा भागामध्ये सापडले २५० वर्षे जुने बंद स्थितीतील शिवमंदिर !

वाराणसी (उत्तरप्रदेश) : येथील मुसलमान मदनपुरा भागामध्ये २५० वर्षे जुने मंदिर गेल्या १० वर्षांपासून बंद असल्याचे समोर आले आहे. या मंदिराचा आतील भाग चिखलाने भरलेला आहे. याची माहिती मिळताच सनातन रक्षक दलाचे सदस्य घटनास्थळी पोचले. या प्रकरणात हस्तक्षेप करून मंदिराचे कुलूप उघडण्याची मागणी सदस्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली आहे. या मंदिराला कुलूप कुणी लावले, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीसही मंदिराच्या ठिकाणी पोचले आणि त्यांनी सदस्यांना शांत करून परत पाठवले. सध्या येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

‘काशीखंड’ या ग्रंथामध्ये मंदिराचा उल्लेख

सनातन रक्षक दलाचे प्रदेशाध्यक्ष अजय शर्मा यांनी सांगितले की, १६ डिसेंबर या दिवशी दुपारी सामाजिक माध्यमांतून एक पोस्ट प्रसारित करण्यात आली. ‘लक्ष द्या. काशीच्या रस्त्यांवर शिवमंदिर बंद स्थितीत आहे. हे मंदिर मदनपुरा येथील घर क्रमांक डी-३१ च्या जवळ आहे’, अशा प्रकारची पोस्ट वाचून मी घटनास्थळी पोचलो, तेव्हा मला मंदिर दिसले. ते २५० वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. गेल्या १० वर्षांपासून याला कुलूप लावण्यात आलेले आहे. आजूबाजूला रहाणारे लोक मंदिराबद्दल स्पष्टपणे काहीही सांगत नव्हते. (आजूबाजूला रहाणारे मुसलमान असल्याने ते याची माहिती का आणि कशाला देतील ? – संपादक) मंदिराचा आतील भाग मातीने भरलेला आहे. ‘काशीखंड’ या ग्रंथामध्ये या मंदिराचा उल्लेख असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रशासनाचे पथक पाहणी करणार : डीसीपी

काशी विभागाचे उपायुक्त गौरव बन्सवाल यांनी सांगितले की, मंदिर जुने आहे. मंदिराच्या दाराला कुलूप आहे. ‘मंदिर कुणाच्या मालकीचे आहे ?’, हे कुणीही सांगू शकत नव्हते. प्रशासनाचे पथक घटनास्थळाची पहाणी करून परिस्थिती स्पष्ट करेल. प्रशासकीय अधिकार्‍यांच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही केली जाईल. खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

संभल येथेही मुसलमानबहुल भागात शिवमंदिर सापडले आणि आता वाराणसी येथेही असेच मंदिर सापडले आहे. देशातील सर्वच मुसलमानबहुल भागांची तपासणी करून तेथे आणखी किती मंदिरे लपवण्यात आली आहेत का ?, हे उघड करण्यासाठी मोहीम राबवण्यासाठी हिंदूंनी राज्य सरकारांवर दबाव निर्माण केला पाहिजे !